महाराष्ट्र दिन स्पेशल: नाकात नथ आणि नऊवारीचा रुबाब! नऊवारी साडी नेसण्याच्याही अनेक पद्धती..

Updated:April 30, 2025 18:50 IST2025-04-30T18:42:52+5:302025-04-30T18:50:41+5:30

Maharashtra Day Special: There are many ways to wear Nauvari saree : नऊवारी नेसण्याच्या साध्या पद्धती. पाहा तुम्हाला कोणती आवडेल.

महाराष्ट्र दिन स्पेशल: नाकात नथ आणि नऊवारीचा रुबाब! नऊवारी साडी नेसण्याच्याही अनेक पद्धती..

विविध राज्यांमध्ये विविध प्रकारचा पोशाख वापरला जातो. मात्र भारतामध्ये प्रत्येक राज्यामध्ये साडी तर नेसलीच जाते. साडी नेसायची पद्धत जरी वेगवेगळी असली तरी साडी नेसली जाते.

महाराष्ट्र दिन स्पेशल: नाकात नथ आणि नऊवारीचा रुबाब! नऊवारी साडी नेसण्याच्याही अनेक पद्धती..

महाराष्ट्रामध्ये अनेक गोष्टी आहेत ज्यांना आपण अस्सल महाराष्ट्रीय म्हणून संबोधतो. त्यामध्ये विविध खाद्यपदार्थ येतात. अगदी सवयीसुद्धा येतात. तसेच पोशाखाचा विषय आल्यावर डोक्यात प्रथम नऊवारीचाच विचार येतो.

महाराष्ट्र दिन स्पेशल: नाकात नथ आणि नऊवारीचा रुबाब! नऊवारी साडी नेसण्याच्याही अनेक पद्धती..

महाराष्ट्रामध्ये विविध सणांना तसेच खास कार्यक्रमांना नऊवारी नेसली जाते. आजही अनेक महिला लग्नाला उभ्या राहताना नऊवारीच नेसणं पसंत करतात.

महाराष्ट्र दिन स्पेशल: नाकात नथ आणि नऊवारीचा रुबाब! नऊवारी साडी नेसण्याच्याही अनेक पद्धती..

नऊवारी नेसण्याच्या विविध पद्धती आजकाल ट्रेंडमध्ये आहेत. पारंपारिक पद्धती तर आहेतच, मात्र इतरही काही नवी पद्धती आता महिला वापरतात, खास करून तरुण वर्गातील मुली.

महाराष्ट्र दिन स्पेशल: नाकात नथ आणि नऊवारीचा रुबाब! नऊवारी साडी नेसण्याच्याही अनेक पद्धती..

ब्राम्हणी नऊवारी हा एक प्रकार आजही अनेक जणींना नेसायला आवडतो. या पद्धतीने नेसलेली साडी अगदीच सुंदर दिसते. पूर्वी ब्राम्हण घरातील महिला अशा साड्या नेसायच्या.

महाराष्ट्र दिन स्पेशल: नाकात नथ आणि नऊवारीचा रुबाब! नऊवारी साडी नेसण्याच्याही अनेक पद्धती..

ब्राम्हणी व पेशवाई पद्धत अनेकांना सारखीच वाटते. मात्र या दोन्ही वेगवेगळ्या पद्धती आहेत. अर्थात त्यामध्ये फार काही फरक नसतो. मात्र संपूर्ण साडी सारख्या पद्धतीने नेसली जात नाही.

महाराष्ट्र दिन स्पेशल: नाकात नथ आणि नऊवारीचा रुबाब! नऊवारी साडी नेसण्याच्याही अनेक पद्धती..

कोळी समाजातील महिला आजही रोज नऊवारी नेसतात. मात्र त्यांची नेसायची पद्धत अगदीच वेगळी असते. काम करताना सुटसुटीत वाटेल, काही अडचण येणार नाही या पद्धतीने ही साडी नेसली जाते.

महाराष्ट्र दिन स्पेशल: नाकात नथ आणि नऊवारीचा रुबाब! नऊवारी साडी नेसण्याच्याही अनेक पद्धती..

उन्हाळ्यामध्ये कॉटनची नऊवारी नेसणे अगदी सुखकर ठरेल. नऊवारीमध्ये घाम खूप येतो. त्याचे ओघळ अगदी पायापर्यंत वाहतात. त्यामुळे जर साडी कॉटनची असेल तर मग अगदीच उत्तम.