Laxmi Pujan Rangoli Designs : लक्ष्मीपूजनाला काढा या सोप्या, सुबक रांगोळ्या; ५ मिनिटांत काढून होईल, वाढेल दाराची शोभा
Updated:October 19, 2025 18:57 IST2025-10-19T18:38:58+5:302025-10-19T18:57:25+5:30
Laxmi Pujan Rangoli Designs : दिवाळी म्हणजे दिव्यांचा सण, दिव्यांभोवती काढलेली रांगोळी घराला खास शोभा देते.जमिनीवर एक मोठा दिवा किंवा अेक छोटे दिवे गोलाकार किंवा एका रांगेत ठेवा.

दिवाळीत लक्ष्मी पूजनाच्या दिवशी घरात विशेषत: दारासमोर आणि पुजेच्या ठिकाणी रांगोळी काढण्याची सुंदर परंपरा आहे. रांगोळीमुळे घरात सकारात्मक वातावरण पसरते. (Laxmi Pujan Rangoli Easy Rangoli For Diwali)
लक्ष्मी पूजनाच्या मूहूर्तावर तुम्ही या साध्या, सोप्या रांगोळ्या दारापुढे काढू शकता. लक्ष्मीच्या पावलांची रांगोळी सर्वात शुभ मानली जाते. लक्ष्मीच्या पावलांचे स्वागत केल्यास घरात संपत्ती आणि समृद्धी येते अशी मान्यता आहे. (Laxmi Pujan Rangoli Designs)
कमळाची रांगोळी तुम्ही काढू शकता. कमळ हे लक्ष्मी देवीचं आसन आहे. चमच्याच्या किंवा बांगडीच्या मदतीनं तुम्ही पाकळ्यांचा बाह्य आकार सहज काढू शकता.
स्वास्तिक हे शुभ आणि कल्याणकारी चिन्ह आहे. तर ओम हे शांतता आणि देवी उर्जेचे प्रतिक आहे.
पुजेच्या जागेच्या मध्यभागी हळद, कूंकु किंवा पांढऱ्या रांगोळीनं साधे स्वास्तिक काढा. चारही बाजूंना एक-एक दिवा ठेवा
ओम किंवा शुभ-लाभ ही चिन्ह पांढऱ्या रंगानं काढून त्याच्या आजूबाजूला साध्या भौमितिक डिजाईन्स काढा.
ठिपक्यांच्या मदतीनं कमीत कमी वेळेत आणि समप्रमाणा सुंदर रांगोळ्या काढता येतात. ठिपके जोडून साधे चौकोनी, त्रिकोणी किंवा षटकोनी आकार तयार करा.या आकृत्यांमध्ये लक्ष्मी पूजनाला शोभतील असे रंग भरा.
दिवाळी म्हणजे दिव्यांचा सण, दिव्यांभोवती काढलेली रांगोळी घराला खास शोभा देते.जमिनीवर एक मोठा दिवा किंवा अेक छोटे दिवे गोलाकार किंवा एका रांगेत ठेवा.