आरीवर्कचं ब्लाऊज वापरताना ५ गोष्टींची काळजी घ्या, ब्लाऊजचं डिझाईन वर्षांनुवर्षे राहील नव्यासारखं सुंदर...
Updated:November 27, 2025 15:59 IST2025-11-27T15:52:04+5:302025-11-27T15:59:29+5:30

हल्ली आरीवर्क ब्लाऊजची खूप फॅशन निघाली आहे. हे ब्लाऊज तयार करून घेण्यासाठी अगदी हजारो रुपये मोजले जातात.
म्हणूनच हे महागडं ब्लाऊजही कौशल्याने हाताळलं पाहिजे. नाहीतर काही वर्षांतच त्याच्यावरची नक्षी, मणी काळसर दिसू लागतात.
सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आरीवर्कच्या ब्लाऊजवर थेट परफ्यूम मारणं टाळावे. परफ्यूममधले केमिकल्स त्याच्यासाठी चांगले नाहीत.
आरीवर्क ब्लाऊज नेहमी उलटं करून घडी घालून ठेवावं. त्यामुळे त्याच्यावरचे काम जास्त दिवस फ्रेश राहाते.
आरीवर्क ब्लाऊज धुण्यासाठी हार्ड केमिकल वापरू नये. ते एखाद्या माईल्ड शाम्पूमध्ये नेहमी उलट बाजुनेच धुवावे.
आरीवर्क ब्लाऊज प्लास्टिकच्या पिशवीमध्ये न ठेवता नेहमी सुती कपड्यातच ठेवावे.
असं महागडं ब्लाऊज वापरताना नेहमी स्वेटपॅडचाच वापर करावा.