खराब झालं तरी फेकू नका फ्रीजमध्ये साठवलेले बटर, ५ पद्धतीने वापरा, घर राहिल साफ - स्वच्छ
Updated:September 7, 2025 16:31 IST2025-09-07T16:28:57+5:302025-09-07T16:31:11+5:30
Spoiled butter uses: Old butter hacks: Butter cleaning tips: Household cleaning tricks: चला तर पाहूया, खराब झालेलं बटर वापरण्याचे ५ भन्नाट उपयोग...

आपण बटर विकत घेतलं की फ्रीजमध्ये महिनाभर साठवून ठेवतो. पण कधी वापरलं जातं तर कधी ते त्याला बुरशी लागते किंवा त्याचा वास येऊ लागतो. आणि अशावेळी ते फेकून द्यावं लागतं. (Spoiled butter uses)
आपण बटर विकत घेतलं की फ्रीजमध्ये महिनाभर साठवून ठेवतो. पण कधी वापरलं जातं तर कधी ते त्याला बुरशी लागते किंवा त्याचा वास येऊ लागतो. आणि अशावेळी ते फेकून द्यावं लागतं. (Spoiled butter uses)
खराब झालेलं बटर कापसावर घेऊन टेबल, खुर्च्या, दरवाज्यांवर घासा. यामुळे दरवाजावरील स्कॅच्रेस कमी होतात आणि फर्निचरला चमक येते.
गंजलेल्या कात्री, चाकू किंवा इतर लोखंडी वस्तूंवर बटर लावून काही वेळ ठेवा आणि मग स्वच्छ पुसा. गंज सहज निघतो.
बूट, बॅग किंवा लेदर बेल्टवर बटर चोळा. त्यामुळे लेदर मऊ होण्यास मदत होते आणि त्याची चमकही टिकते.
बाटल्या किंवा डब्यावरचे स्टिकर निघून गेल्यानंतर त्यावर गम तसाच राहतो. त्या जागी बटर लावून काही वेळ ठेवलं की गम सहज निघतो.
भांड्यांवर चिकट तेलाचे डाग राहिले असतील तर बटर लावून पुसा. नंतर कोमट पाण्याने स्वच्छ धुवा, यामुळे भांडी चमकण्यास मदत होईल.