Join us   

बाथरुमची फरशी- भिंती-टाइल्स पिवळ्या दिसतात? १ सोपा उपाय- कमी मेहनतीत बाथरुम चकाचक....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 07, 2024 5:18 PM

1 / 7
बाथरुम ही आपल्या घरातली अशी जागा असते जी दिवसातून अधिक काळ ओलसर, दमट असते.
2 / 7
त्यातच जर आपण तिथली स्वच्छता करण्यास कमी पडलो, तर मग मात्र बाथरुमच्या फरशा तसेच भिंतींवरच्या टाईल्स पिवळट दिसू लागतात.
3 / 7
हा पिवळसर रंग टाईल्सला एकदा चढला की तो लवकर निघत नाही आणि मग बाथरूम खूपच अस्वच्छ दिसू लागते.
4 / 7
म्हणूनच बाथरुममधल्या फरशांना पडलेला हा पिवळट, काळपट रंग कमीतकमी मेहनतीत कसा काढून टाकायचा याविषयीचा एक व्हिडिओ housewife_to_homemaker या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे.
5 / 7
हा उपाय करण्यासाठी आपल्याला फक्त २ पदार्थ लागणार आहेत. त्यापैकी एक आहे व्हाईट व्हिनेगर आणि दुसरं आहे डिशवॉश लिक्विड. हे दोन्ही पदार्थ समप्रमाणात घ्या.
6 / 7
सगळ्यात आधी बाथरुमच्या भिंतींवर थोडं पाणी शिंपडून त्या ओलसर करून घ्या. यानंतर व्हिनेगर आणि डिशवॉश लिक्विड यांचं मिश्रण भिंतींवर शिंपडा. १० ते १५ मिनिटे ते तसंच राहू द्या आणि त्यानंतर एखादा ब्रश घेऊन ते घासून काढा.
7 / 7
खूपच कमी वेळात आणि कमी मेहनतीत पिवळट डाग निघून जातील आणि बाथरुम एकदम चकाचक होऊन जाईल.
टॅग्स : स्वच्छता टिप्सहोम रेमेडी