शर्टची कॉलर असो वा चुरगळलेला ड्रेस, इस्त्री न करता घालवा प्रत्येक सुरकुती - पाहा ७ भन्नाट ट्रिक्स...
Updated:April 2, 2026 20:05 IST2026-04-02T20:00:20+5:302026-04-02T20:05:01+5:30
how to remove wrinkles from clothes without iron at home : wrinkle free clothes without iron : घाईच्या वेळी इस्त्री करायला वेळच नाही, ७ टिप्स - चुरगळलेले कपडे मिनिटांत दिसतील नव्यासारखे कडक....

wrinkle free clothes without iron
कपाटात कपड्यांचा ढीग लागला की, कितीही नीट ठेवले तरी ते चुरगळतातच. अशा परिस्थितीत, महत्त्वाच्या कार्यक्रमाला जायला निघताना नेमका आवडता ड्रेस चुरगळलेला किंवा सुरकुत्या पडलेला दिसला की खूपच चिडचिड होते. अशावेळी जर घरात वीज नसेल किंवा इस्त्री खराब झाली असेल, तर काय करायचे? काळजी करू नका!(how to remove wrinkles without ironing).
remove wrinkles from clothes at home
कपड्यांवरील सुरकुत्या काढण्यासाठी किंवा चुरगळलेले कपडे एकदम नव्यासारखे कडक दिसावेत यासाठी प्रत्येक वेळी इस्त्रीचीच गरज असते असे नाही.
remove creases from clothes naturally
काही सोप्या आणि घरगुती ट्रिक्सच्या मदतीने तुम्ही इस्त्री न करता देखील कपड्यांवरील सुरकुत्या दूर करून त्यांना अगदी टापटीप आणि कडक लुक देऊ शकता. इस्त्री न वापरता कपडे प्रेस करण्याच्या 'स्मार्ट' टिप्स कोणत्या ते पाहा...
१. हेअर ड्रायरचा वापर :-
जर तुमच्याकडे हेअर ड्रायर असेल, तर तो एक उत्तम 'मिनी आयर्न' म्हणून काम करू शकतो. चुरगळलेल्या कपड्यावर हलका पाण्याचा हबका मारा आणि त्यानंतर ड्रायरने गरम हवा द्या. ड्रायर फिरवताना कपडा दुसऱ्या हाताने घट्ट ओढून धरा. काही मिनिटांतच गरम हवेमुळे सुरकुत्या गायब होतील.
२. हेअर स्ट्रेटनरचा स्मार्ट वापर :-
शर्टची कॉलर, कफ किंवा कुर्तीच्या कडा प्रेस करण्यासाठी हेअर स्ट्रेटनर हा सर्वात सोपा पर्याय आहे. कमी तापमानावर स्ट्रेटनर गरम करा आणि तो कॉलरवर फिरवा. कडक कॉलरसाठी हा उपाय अतिशय जलद काम करतो.
३. उशीचे प्रेशर द्या :-
कपड्यांवरील सुरकुत्या घालवण्याची ही बरीच जुनी पद्धत आहे. यासाठी कपडा नीट सरळ पसरवून उशीच्या खाली २० ते ३० मिनिटांसाठी दाबून ठेवा. कपडे खराब होऊ नयेत यासाठी तुम्ही त्यावर एखादा पातळ दुपट्टा देखील ठेवू शकता. उशीच्या वजनामुळे कपड्यांवरील सुरकुत्या बऱ्याच अंशी निघून जातात.
४. पाणी आणि व्हिनेगरचा स्प्रे :-
कपडे धुताना पाण्यात थोड व्हाईट व्हिनेगर मिसळा, असे केल्याने कपडे मऊ राहण्यास मदत मिळते. तुम्ही एका स्प्रे बाटलीमध्ये पाणी आणि व्हिनेगर मिसळून कपड्यांवर हलका स्प्रे करा आणि हँगरवर टांगून ठेवा. यामुळे सुरकुत्या कमी होण्यास मदत होईल, तसेच कपड्यांचा दुर्गंधही दूर होईल.
५. गरम पाण्याची वाफ :-
जर तुम्ही गरम पाण्याने आंघोळ करणार असाल, तर तुमचा चुरगळलेला कपडा बाथरुममध्ये एका हँगरला टांगून ठेवा. गरम पाण्याचा वापर करताना तयार होणाऱ्या वाफेमुळे कपड्यांवरील सुरकुत्या आपोआप निघून जातात. आंघोळ झाल्यानंतर १० ते १५ मिनिटांनी कपडा बाहेर काढून झटकला की तो नीट होतो.
६. गरम पाण्याचे पातेल :-
ही एक जुनी आणि अत्यंत फायदेशीर पद्धत आहे. एका स्टीलच्या पातेल्यात पाणी गरम करा. पाणी उकळले की ते काढून टाका आणि त्या गरम पातेल्याच्या तळाचा वापर इस्त्रीप्रमाणे करा. पातेले गरम असताना कपड्यावर फिरवल्यास ते अगदी प्रेस केल्यासारखे कडक होतात. फक्त पातेले स्वच्छ असल्याची खात्री करून घ्या.
७. ओल्या टॉवेलचा उपयोग करा :-
कपडे सपाट पसरून त्यावर हलकासा ओला टॉवेल ठेवून हाताने दाब द्या. यामुळे सुरकुत्या कमी होतात.