Rust from Locks: पावसाळ्यात कड्या-कुलूप-किल्ली गंजले? १ सोपी ट्रिक-बिघडलेलं कुलूपही होईल मस्त-गंज गायब
Updated:August 11, 2025 18:35 IST2025-08-11T18:30:00+5:302025-08-11T18:35:02+5:30
remove rust from lock: monsoon rust solution: rust removal home remedies: काही सोपे घरगुती उपाय केल्यास कुलूपवरील गंज निघून जाण्यास मदत होईल.

पावसाळा सुरु झाला की, हवेत आर्द्रता पसरते. ज्यामुळे लोखंडी वस्तूंवर गंज लवकर लागतो. कुलूप, कडी किंवा लोखंडी रॉडवर हवा, पाणी किंवा पावसाचे थेंब पडले की त्यांचा रंग बदलून गंज लागतो. (remove rust from lock)
कुलूप किंवा दरवाज्याच्या कड्यांना गंज लागला की, ते लवकर उघडत नाही, तुटतात किंवा अडकतात. कितीही प्रयत्न केले तरी गंजांमुळे ते अडकून राहतात. अशावेळी काही सोपे घरगुती उपाय केल्यास कुलूप नीट उघडण्यास मदत होईल. (monsoon rust solution)
सगळ्यात आधी आपल्याला कुलूप किंवा कडीवर थोडंसं नारळाचे तेल, मशीन ऑइल किंवा पेट्रोलियम जेली लावायला हवी.
तेलाचा पातळ थर कुलूप किंवा कडीवर गंज बसू देत नाही. तसेच आधी जर गंज लागला असेल तर तो सैल होऊन निघतो.
गंज खूप जास्त असेल तर जुन्या टूथब्रशने किंवा स्टील स्क्रबरने हलक्या हाताने घासून काढा.
जर वेळोवेळी आपण कुलूप, दरवाज्याच्या कडीची नीट काळजी घेतली तर गंज लागणार नाही. तसेच नवीन कुलूप घेण्याची गरजही पडणार नाही.