सणावारासाठी वाती करण्याच्या भन्नाट ६ ट्रिक्स! किचकट काम होईल फक्त मिनिटभरात - वाती दिसतील सुंदर - सुबक...

Updated:August 27, 2025 15:01 IST2025-08-27T14:39:56+5:302025-08-27T15:01:54+5:30

how to make batti for diya : how to make cotton batti in less time for diya : In 2 Sec How To Make Cotton Wicks At Home : वाती तयार करण्याच्या या ६ ट्रिक्स तुमचं किचकट, वेळखाऊ काम अधिकच सहज सोपे करु शकतात.

सणावारासाठी वाती करण्याच्या भन्नाट ६ ट्रिक्स! किचकट काम होईल फक्त मिनिटभरात - वाती दिसतील सुंदर - सुबक...

गौरी - गणपतीच्या सणाला सुरुवात झाली आहे. सणवार (how to make batti for diya) म्हटलं की पूजाअर्चा, आरत्या ओघाने आल्याचं. या सणाच्या निमित्ताने आपण दिव्यांची आरास करतोच. कधी सजावट म्हणून तर कधी देवापुढे दिवा तेवत ठेवायचा म्हणून तर कधी पूजाविधीसाठी दिवा, निरांजन लावतो. दिवा, निरांजन लावायचं म्हणजे वाती (In 2 Sec How To Make Cotton Wicks At Home) देखील तितक्याच लागतात.

सणावारासाठी वाती करण्याच्या भन्नाट ६ ट्रिक्स! किचकट काम होईल फक्त मिनिटभरात - वाती दिसतील सुंदर - सुबक...

खास सणावाराला दिवा, निरांजन लावण्यासाठी (how to make cotton batti in less time for diya) वाती लागतातच. वाती तयार करण्यासाठी जास्त वेळ लागतोच. वाती वळण्याचे हे किचकट, वेळखाऊ काम आपण अगदी झटपट करण्यासाठी काही सोप्या ट्रिक्स वापरू शकतो. कमी वेळात जास्त वाती तयार करण्यासाठी पाहा या काही भन्नाट ट्रिक्स...

सणावारासाठी वाती करण्याच्या भन्नाट ६ ट्रिक्स! किचकट काम होईल फक्त मिनिटभरात - वाती दिसतील सुंदर - सुबक...

प्लास्टिकची जाडसर पिशवी किंवा शीट घ्या. पिशवीवर कापूस लांबसर पसरवा. कापसावर थोडेसे पाणी शिंपडा, त्यामुळे कापूस प्लास्टिकच्या शीटला चिकटून चिकटून राहील. आता पिशवीसोबत कापूस हाताच्या तळव्यावर ठेवून गोलाकार फिरवा. अशाप्रकारे एकाच वेळी अनेक लांबसर वाती तयार होतील.

सणावारासाठी वाती करण्याच्या भन्नाट ६ ट्रिक्स! किचकट काम होईल फक्त मिनिटभरात - वाती दिसतील सुंदर - सुबक...

एका भांड्यात पाणी घेऊन त्यात कापूस हलकेच बुडवा. कापसातील अतिरिक्त पाणी पिळून काढा. आता कापसाचा छोटा गोळा घेऊन तळहाताच्या साहाय्याने गोलाकार फिरवा. यामुळे वातीला योग्य आकार मिळेल आणि त्या व्यवस्थित तयार होतील.

सणावारासाठी वाती करण्याच्या भन्नाट ६ ट्रिक्स! किचकट काम होईल फक्त मिनिटभरात - वाती दिसतील सुंदर - सुबक...

टेबलसारख्या सपाट पृष्ठभागावर कापूस पसरवून ठेवावा. त्यानंतर त्यावर एक टूथपिक किंवा मोठी सुई ठेवा आणि गोलाकार फिरवत पुढे न्या. यामुळे वात व्यवस्थित वळली जाते. ही पद्धत खासकरून लांब वाती बनवण्यासाठी सोपी आहे.

सणावारासाठी वाती करण्याच्या भन्नाट ६ ट्रिक्स! किचकट काम होईल फक्त मिनिटभरात - वाती दिसतील सुंदर - सुबक...

मेणबत्तीचे वितळलेले मेण घ्या. कापूस मेणात बुडवून लगेच बाहेर काढा. आता मेणाच्या साहाय्याने वातीला हवा तसा आकार द्या. या वाती तेलात लवकर विझत नाहीत आणि जास्त वेळ जळतात.

सणावारासाठी वाती करण्याच्या भन्नाट ६ ट्रिक्स! किचकट काम होईल फक्त मिनिटभरात - वाती दिसतील सुंदर - सुबक...

तुपाच्या वात्या करण्यासाठी सगळ्यात आधी साजूक तूप एका भांड्यात काढून वितळवून घ्या. तूप वितळवून थोडं थंड केल्यानंतर वातीतवर घाला. वातीत तुपात भिजवल्यानंतर साच्यात घाला. नंतर पुन्हा त्यावर तूप घाला. या वात्या फ्रीजमध्ये १० ते १५ मिनिटांसाठी ठेवून घ्या. नंतर ते साचा बाहेर काढून वाती बाहेर काढा. एका पॉलीथिनमध्ये बँगमध्ये ठेवून फ्रीजमध्ये किंवा बाहेरही ठेवू शकता.

सणावारासाठी वाती करण्याच्या भन्नाट ६ ट्रिक्स! किचकट काम होईल फक्त मिनिटभरात - वाती दिसतील सुंदर - सुबक...

थोडासा कापूस घेऊन त्याच्या फुलवाती तयार करून घ्या. आता एका कढईत मेणबत्तीचे काही तुकडे घेऊन ते वितळवून घ्यावेत. त्यानंतर त्यात थोडंसं तूप आणि कापसाच्या ३ ते ४ वड्या घालाव्यात. हे सगळं मिश्रण व्यवस्थित विरघळवून घ्यावं. आता एका कपमध्ये हे मिश्रण ओतून त्यात एक फुलवात ठेवून त्यात ते वितळवून घेतलेले मिश्रण ओतून घ्यावे. त्यानंतर व्यवस्थित सुकू द्यावं. थोड्या वेळाने या वाती ट्रे मधून काढून घेऊन एका डब्यात स्टोअर करून ठेवाव्यात.