उन्हाळ्यात पालीच्या पिल्लांचा सुळसुळाट? कापसाचा बोळा घेऊन करा 'हा' उपाय- पाली घरातून गायब होतील
Updated:March 7, 2025 15:48 IST2025-03-07T15:44:09+5:302025-03-07T15:48:47+5:30

उन्हाळ्यात पालींचा त्रास खूप वाढतो. पालींची पिल्लंसुद्धा घरात जिकते तिकडे फिरताना दिसू लागतात.
म्हणूनच त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी हा एक सोपा उपाय करून पाहा. हा उपाय indian_vlogger_pinki या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे.
हा उपाय करण्यासाठी कापुराच्या ६ ते ७ वड्या घ्या आणि त्यांची पावडर करा.
आता या पावडरमध्ये ॲण्टीसेप्टिक लिक्विड टाका. दोन्ही पदार्थ व्यवस्थित कालवून घ्या आणि त्यामध्ये कापूस बुडवा.
आता या कापसाचे बोळे घरात जिथे पाली जास्त दिसतात त्या भागात ठेवून द्या. खिडक्यांच्या, दारांच्या चौकटीमध्ये ठेवा. पाली दूर पळतील.