ब्लाऊजमधून ब्रा च्या पट्ट्या दिसतात? 'या' ट्रिक्स वापरा, काहीही घाला-ब्राच्या पट्ट्या नीट लपतील
Updated:September 25, 2025 17:19 IST2025-09-25T16:53:11+5:302025-09-25T17:19:04+5:30
How To Hide Bra Straps when You Wearing Blouse : ब्लाऊजच्या आत खांद्याजवळ छोटे हुक किंवा लूप्स (Loops) लावून घ्या.

ब्लाऊज किंवा टॉप, कुर्ता घातल्यानंतर त्यातून ब्रा च्या पट्ट्या दिसतात अशी तक्रार बऱ्याच महिलांची असते. ब्रा च्या पट्ट्या दिसल्या तर अवघडल्यासारखं वाटतं आणि ड्रेसिंगही व्यवस्थित दिसत नाही. ब्रा च्या पट्ट्या दिसू नये यासाठी काही टिप्स पाहूया.(How To Hide Bra Straps)
ब्लाऊज आणि ब्राच्या पट्टीला जोडण्यासाठी फॅशन टेप किंवा छोटी सेफ्टी पीन वापरा. यामुळे ब्राची पट्टी जागच्या जागी राहते आणि ती खांद्यावरून खाली घसरत नाही.
ब्लाऊजच्या आत खांद्याजवळ छोटे हुक किंवा लूप्स (Loops) लावून घ्या. यामुळे तुम्ही ब्राची पट्टी त्या लूपमध्ये अडकवू शकता.
ऑफ-शोल्डर, डीप नेक किंवा रुंद गळ्याचे ब्लाऊज (Wide Neck Blouse) असतील, तेव्हा स्ट्रॅपलेस ब्रा हा सर्वोत्तम पर्याय आहे. हे ब्रा सपोर्ट देतात आणि पट्ट्या दिसण्याचा प्रश्नच येत नाही.
जर तुम्हाला पट्ट्या हव्याच असतील, तर पारदर्शक पट्ट्या असलेली ब्रा निवडा. लांबून पाहिल्यास त्या सहज लक्षात येत नाहीत.
बाजारात ब्रा स्ट्रॅप क्लॅम्प्स मिळतात.हे क्लॅम्प्स दोन्ही पट्ट्या पाठीमागून जवळ आणतात, ज्यामुळे तुमच्या ब्लाऊजच्या मानेच्या आतील भागातून पट्ट्या दिसणार नाहीत.
लाईट रंगाच्या ब्लाऊजवर गडद रंगाची ब्रा (Dark Color Bra) वापरणे टाळा.