घराच्या कोपऱ्यात-भिंतीवर कोळ्यांचे जाळे लागते? ४ सोपे उपाय- घर राहिल स्वच्छ- नीटनेटके

Updated:June 1, 2025 17:03 IST2025-06-01T17:01:42+5:302025-06-01T17:03:59+5:30

how to get rid of spiders at home: home remedies for spiders: spider control tips:पावसाळ्यात भिंती ओल्या झाल्या की, कोळी जाळे सहज विणत राहतात. अशावेळी काही सोपे घरगुती उपाय केले तर फायदेशीर राहिल.

घराच्या कोपऱ्यात-भिंतीवर कोळ्यांचे जाळे लागते? ४ सोपे उपाय- घर राहिल स्वच्छ- नीटनेटके

घरात झुरळ, पालं, डास आणि मुंग्या झाल्या तर आपण त्याच्यावर नेहमीच काही ना काही उपाय करतो. स्प्रे तयार करणे किंवा घरगुती गोष्टींचा वापर करणे. (how to get rid of spiders at home)

घराच्या कोपऱ्यात-भिंतीवर कोळ्यांचे जाळे लागते? ४ सोपे उपाय- घर राहिल स्वच्छ- नीटनेटके

आपल्याला पैकी अनेकांना रोजच घर साफ करता येत नाही त्यामुळे घरात धुळ साचते. त्यासोबत भिंतींच्या कोपऱ्यात कोळ्यांचे जाळे तयार होते. पावसाळ्यात भिंती ओल्या झाल्या की, कोळी जाळे सहज विणत राहतात. अशावेळी काही सोपे घरगुती उपाय केले तर फायदेशीर राहिल.(home remedies for spiders)

घराच्या कोपऱ्यात-भिंतीवर कोळ्यांचे जाळे लागते? ४ सोपे उपाय- घर राहिल स्वच्छ- नीटनेटके

रात्री कपभर पाण्यात लिंबाचा रस मिसळून स्प्रे बाटलीत भरा. भिंतीच्या कोपऱ्यात किंवा कोळ्यांचे जाळे असेल तिथे स्प्रे करा. त्यामुळे कीटक घराबाहेर निघून जातील.

घराच्या कोपऱ्यात-भिंतीवर कोळ्यांचे जाळे लागते? ४ सोपे उपाय- घर राहिल स्वच्छ- नीटनेटके

व्हिनेगर हा सर्व कीटकांवर प्रभावशाली मार्ग आहे. कपभर पांढरा व्हिनेगर घेऊन त्यात पाणी घालून स्प्रे तयार करा. भिंतीवर, कोपऱ्यात किंवा जिथे कोळ्यांचे जाळे असेल तिथे फवारणी करा. व्हिनेगरचा वास कोळी पळवून लावण्यास मदत करेल.

घराच्या कोपऱ्यात-भिंतीवर कोळ्यांचे जाळे लागते? ४ सोपे उपाय- घर राहिल स्वच्छ- नीटनेटके

पेपरमिंट ऑइलचे काही थेंब पाण्यात मिसळा आणि स्प्रे बाटलीत भरा. दारे, खिडक्या आणि कोपऱ्यांवर स्प्रे करा. या पद्धतीने कोळी निघून जातील. तसेच घरात छान सुगंध दरवळेल.

घराच्या कोपऱ्यात-भिंतीवर कोळ्यांचे जाळे लागते? ४ सोपे उपाय- घर राहिल स्वच्छ- नीटनेटके

कडुलिंबाच्या तेलात अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-इन्सेक्ट गुणधर्म आहेत. जे कीटकांना पळवून लावण्याचे काम करते. पाण्यात कडुलिंबाच्या तेलाचे काही थेंब मिसळा. घराच्या कोपऱ्यांवर किंवा भिंतीवर शिंपडा.

घराच्या कोपऱ्यात-भिंतीवर कोळ्यांचे जाळे लागते? ४ सोपे उपाय- घर राहिल स्वच्छ- नीटनेटके

लसणाचा वास हा उग्र असतो, ज्यामुळे कीटक फारसे घरात फिरत नाही. अशावेळी लसणाच्या पाकळ्या कुस्करुन पाण्यात मिसळा आणि याची स्प्रे बाटली करा. ज्या ठिकाणी जाळे आहे तिथे स्प्रे करा.