स्वयंपाकघरात पाली फिरतात- भीती वाटते? खिडकीत ठेवा 'ही' ५ जादूई रोपं, पाली जातील पळून- पुन्हा फिरकणारही नाहीत

Updated:March 29, 2026 11:24 IST2026-03-27T16:46:54+5:302026-03-29T11:24:06+5:30

Natural Lizard Repellents: Kitchen Safety Tips: Indoor Plants for Kitchen:किचनच्या खिडकीत किंवा कोपऱ्यात ही ५ झाडं लावून आपण पालींना घराबाहेर पळवू शकतो.

स्वयंपाकघरात पाली फिरतात- भीती वाटते? खिडकीत ठेवा 'ही' ५ जादूई रोपं, पाली जातील पळून- पुन्हा फिरकणारही नाहीत

घरात रात्रीच्या वेळी किंवा अचानक भिंतीवर चालणारी पाल दिसली की अनेकांची घाबरगुंडी उडते. पाली या केवळ दिसायला भीतीदायक नसतात तर त्या आरोग्यासाठीही तितक्यात घातक ठरु शकतात. पालींच्या विष्ठेमुळे किंवा लाळेमुळे अन्नातून विषबाधा होण्याचा धोका असतो. अनेकदा आपण पालींना पळवून लावण्यासाठी रासायनिक स्प्रे किंवा औषधांचा वापर करतात. पण स्वयंपाकघरात अशा रासायनिक घटकांचा वापर करणं आरोग्यासाठी सुरक्षित नसते. (Natural Lizard Repellents)

स्वयंपाकघरात पाली फिरतात- भीती वाटते? खिडकीत ठेवा 'ही' ५ जादूई रोपं, पाली जातील पळून- पुन्हा फिरकणारही नाहीत

जर आपल्यालाही पालींची भीती वाटत असेल तर रासायनिक घटकांऐवजी काही नैसर्गिक उपाय करु शकतो. निसर्गातील काही वनस्पतींचा सुगंध हा पालींसाठी अधिक त्रासदायक असतो. त्यासाठी किचनच्या खिडकीत किंवा कोपऱ्यात ही ५ झाडं लावून आपण पालींना घराबाहेर पळवू शकतो. (Kitchen Safety Tips)

स्वयंपाकघरात पाली फिरतात- भीती वाटते? खिडकीत ठेवा 'ही' ५ जादूई रोपं, पाली जातील पळून- पुन्हा फिरकणारही नाहीत

लेमनग्रासमध्ये सिट्रोनेला नावाचे तेल असते. ज्याचा लिंबासारखा सुगंध येतो. हा सुगंध पालींसाठी अतिशय त्रासदायक ठरतो. किचनच्या खिडकीत लेमनग्रासचे छोटीशी कुंडी ठेवल्यास पाली घरात शिरणार नाही.

स्वयंपाकघरात पाली फिरतात- भीती वाटते? खिडकीत ठेवा 'ही' ५ जादूई रोपं, पाली जातील पळून- पुन्हा फिरकणारही नाहीत

पुदिन्याचा थंड आणि उग्र वास आपल्याला आवडतो. पण पालीसह इतर किटकांना हा वास आवडत नाही. पुदिन्याचे रोप खिडकीजवळ लावल्यास किंवा त्याच्या तेलाचा स्प्रे केल्यास पाली आपोआप लांब राहतात.

स्वयंपाकघरात पाली फिरतात- भीती वाटते? खिडकीत ठेवा 'ही' ५ जादूई रोपं, पाली जातील पळून- पुन्हा फिरकणारही नाहीत

अंगणात असलेली तुळस ही उत्तम कीटकनाशक आहे. तुळशीच्या पानांचा विशिष्ट सुगंध पालींना घरापासून दूर ठेवण्यास मदत करते. तुळशीमुळे आपल्या स्वयंपाकघरातील हवा शुद्ध होते. त्यासाठी खिडकीजवळ तुळशीचे रोप लावा.

स्वयंपाकघरात पाली फिरतात- भीती वाटते? खिडकीत ठेवा 'ही' ५ जादूई रोपं, पाली जातील पळून- पुन्हा फिरकणारही नाहीत

झेंडूच्या फुलांचा आणि पानांचा वास खूप तीव्र असतो. बागांमध्ये कीटकांना रोखण्यासाठी झेंडू लावला जातो. किचनच्या गॅलरीत किंवा खिडकीत झेंडूचे रोप लावल्यास पाली आसपासही फिरकणारही नाहीत.

स्वयंपाकघरात पाली फिरतात- भीती वाटते? खिडकीत ठेवा 'ही' ५ जादूई रोपं, पाली जातील पळून- पुन्हा फिरकणारही नाहीत

रोझमेरी हे एक औषधी आणि सुगंधी रोप आहे. याचा सुगंध पालींना त्रास देतो. हे रोप कमी सूर्यप्रकाशातही किचनमध्ये चांगलं जगू शकते.