शर्ट स्वच्छ पण कॉलर मळालेली? घ्या उपाय- १ मिनिटात काळपटपणा जाऊन कॉलर होईल स्वच्छ
Updated:May 23, 2025 16:46 IST2025-05-23T16:34:58+5:302025-05-23T16:46:28+5:30

पांढरे शर्ट वापरताना आणि धुताना खूप जपून राहावे लागते. कारण लगेच त्यांचा रंग खराब होतो. कधी पिवळट तर कधी मळकट दिसतो.
पण तरीही पांढऱ्या शर्टमध्ये खूप छान फॉर्मल लूक येत असल्याने अनेक जण ऑफिससाठी पांढरे शर्टच घालतात. शिवाय काही विद्यार्थ्यांचा युनिफॉर्मही पांढऱ्याच रंगाचा असतो.
पांढरे शर्ट धुतल्यानंतर बऱ्याचदा असं दिसतं की शर्ट तर स्वच्छ आहे, पण त्याची कॉलर मात्र अजूनही मळकट, कळकटच आहे.
म्हणूनच आता ही एक अतिशय सोपी ट्रिक पाहा आणि पांढऱ्या किंवा फिकट रंगाच्या शर्टची काॅलर कमीतकमी मेहनतीत आणि कमीतकमी वेळात अगदी चकाचक करा.
हा उपाय करण्यासाठी आपल्याला तुरटी लागणार आहे. सगळ्यात आधी शर्टच्या कॉलरवर कोमट पाणी टाकून ती ओलसर करा. त्यानंतर त्यावर तुरटी घासा.
तुरटीमध्ये असणारे एल्युमिनियम सल्फेट आणि पोटॅशियम सल्फेट कॉलरचा काळेपणा काढून टाकण्यास मदत करतात.
यानंतर आता तुमचे नेहमीचे डिटर्जंट काॅलरवर टाका आणि कपडे घासण्याच्या ब्रशने कॉलर घासून काढा. अगदी स्वच्छ होऊन जाईल. करून बघा.