चांदीचे दागिने गरम तव्यावर ठेवा आणि जादू पाहा- ५ मिनिटांत नव्यासारखे लख्ख चमकतील

Updated:August 12, 2025 18:03 IST2025-08-12T17:00:42+5:302025-08-12T18:03:10+5:30

चांदीचे दागिने गरम तव्यावर ठेवा आणि जादू पाहा- ५ मिनिटांत नव्यासारखे लख्ख चमकतील

गौरी- गणपतीचे दिवस आता जवळ आले आहेत. त्यामुळे सणासुदीच्या दिवसांत छान छान दागिने, साड्या, पारंपरिक कपडे घालून सजणं ओघाने आलंच..

चांदीचे दागिने गरम तव्यावर ठेवा आणि जादू पाहा- ५ मिनिटांत नव्यासारखे लख्ख चमकतील

म्हणूनच या दिवसांत घालण्यासाठी चांदीचे दागिने अगदी आतापासूनच स्वच्छ करून ठेवा. म्हणजे मग कधीही वेळ आली की छान चमकदार दागिने अगदी झटपट घालता येतील.

चांदीचे दागिने गरम तव्यावर ठेवा आणि जादू पाहा- ५ मिनिटांत नव्यासारखे लख्ख चमकतील

हा उपाय करून तुम्ही चांदीचे पैंजन, गळ्यातल्या माळा, साखळ्या, कानातले , बांगड्या असे चांदीचे वेगवेगळे दागिने स्वच्छ करू शकता.

चांदीचे दागिने गरम तव्यावर ठेवा आणि जादू पाहा- ५ मिनिटांत नव्यासारखे लख्ख चमकतील

हा उपाय करण्यासाठी सगळ्यात आधी गॅसवर एक तवा गरम करायला ठेवा. तवा गरम झाल्यानंतर त्यावर चांदीचे दागिने टाका.

चांदीचे दागिने गरम तव्यावर ठेवा आणि जादू पाहा- ५ मिनिटांत नव्यासारखे लख्ख चमकतील

आता गरम तव्यावर चांदीचे दागिने घातल्यानंतर ते थोडे हलवा जेणेकरून ते सगळीकडून गरम होतील.

चांदीचे दागिने गरम तव्यावर ठेवा आणि जादू पाहा- ५ मिनिटांत नव्यासारखे लख्ख चमकतील

आता गरम तव्यावर आणि गरम झालेल्या दागिन्यांवर कोणतेही सोडा असणारे सॉफ्ट ड्रिंक घाला.

चांदीचे दागिने गरम तव्यावर ठेवा आणि जादू पाहा- ५ मिनिटांत नव्यासारखे लख्ख चमकतील

सॉफ्ट ड्रिंकऐवजी तुम्ही त्यावर बेकिंग साेड्याचं पाणीही घालू शकता. या पाण्यामध्ये चांदीचे दागिने चांगले बुडायला हवे. साधारण २ ते ३ मिनिटांनी दागिने तव्यावरून खाली घ्या. आणि स्वच्छ पाण्याने धुवून घ्या.

चांदीचे दागिने गरम तव्यावर ठेवा आणि जादू पाहा- ५ मिनिटांत नव्यासारखे लख्ख चमकतील

काळे पडलेले चांदीचे दागिने अगदी नव्यासारखे लख्खं चमकलेले दिसतील.