मिक्सरवर काळ्या- पिवळ्या डागांचे थर जमा झालेत? ५ सोपे उपाय, मिक्सर चमकेल नव्यासारखा...
Updated:May 11, 2025 18:05 IST2025-05-11T18:00:00+5:302025-05-11T18:05:01+5:30
How to clean mixer stains: Remove yellow stains from mixer: मिक्सरवरील डाग काढण्यासाठी काही सोप्या टिप्स लक्षात ठेवा.

आपल्या प्रत्येकाच्या स्वयंपाकघरात मिक्सर असतो. मसाल्याचे वाटण करण्यापासून इतर अनेक पदार्थ आपण यामध्ये वाटतो. परंतु, अनेकदा यावर मसाल्याचे किंवा पाण्याच्या डागाचे थर जमा होतात. (How to clean mixer stains)
आठवड्यातून एकदा तरी आपण मिक्सर स्वच्छ करतो परंतु,कितीही स्वच्छ केले तरी मिक्सरवर काळ्या-पिवळ्या डागांचे थर जमा होतात. (Home hacks to clean mixer grinder)ज्यामुळे मिक्सर वापरताना आपल्याला किळसवाणे वाटते. मिक्सरवरील डाग काढण्यासाठी काही सोप्या टिप्स लक्षात ठेवा. (Remove yellow stains from mixer)
मिक्सरच्या जारमध्ये बेकिंग सोडा आणि थोडे व्हिनेगर घालून पेस्ट तयार करा. १० मिनिटे तसेच ठेवून स्पंज किंवा ब्रशने मिक्सर स्वच्छ करा. पिवळे डाग आणि दुर्गंधी दूर होईल.
लिंबाचा रस हा डाग घालवण्यासाठी फायदेशीर आहे. यासाठी चिमूटभर मीठात लिंबाचा रस मिसळवून डाग असलेल्या भागावर लावा. १५ मिनिटानंतर स्पंजने घासा आणि कोमट पाण्याने स्वच्छ करा.
गरम पाण्यामध्ये डिशवॉश घालून स्पंज २० मिनिटे ठेवा. त्यानंतर मिक्सरवर चांगले घासा यावर पुन्हा ब्रशने घासल्याने तेलाचे आणि पिवळे डाग निघण्यास मदत होईल.
मिक्सरवरील हलके पिवळे डाग साफ करण्यासाठी डागांवर ३ टक्के हायड्रोजन पेरॉक्साइड लावा, १० मिनिटांनी धुवा. प्लास्टिकवर याचा काळजीपूर्वक वापर करा.
अर्धा कप व्हिनेगर आणि गरम पाणी बरणीत भरून २० मिनिटे ठेवा. ब्रशने मिक्सरवरील डाग या पाण्याने स्वच्छ करा. व्हिनेगरमुळे हट्टी डाग निघण्यास मदत होईल.