रोज स्वच्छ करूनही किचन अस्वच्छ, कळकट दिसतं? ५ टिप्स ; नीटनेटकं, नवंकोर दिसेल किचन

Published:February 7, 2023 12:29 PM2023-02-07T12:29:50+5:302023-02-07T13:24:56+5:30

How to Clean Kitchen : स्वयंपाकघरातील टाइल्स स्वच्छ करण्यासाठी, साबण वापरून डिशवॉशिंग स्क्रबरने भिंती हलक्या हाताने घासून घ्या.

रोज स्वच्छ करूनही किचन अस्वच्छ, कळकट दिसतं? ५ टिप्स ; नीटनेटकं, नवंकोर दिसेल किचन

किचन आपल्या घराचा महत्वपूर्ण भाग आहे. (How to clean Kitchen) महिला घरी असल्यानंतर जास्तीत जास्त वेळ किचनचा पसारा आवरण्यात घालवतात. किचन व्यवस्थित स्वच्छ, सुंदर ठेवणं खूपच महत्वाचं असतं त्यामुळे तुमचा मूडही फ्रेश राहतो. किचन स्वच्छ करण्याच्या काही सोप्या टिप्स तुम्हाला घर स्वच्छ ठेवण्यात मदत करतील.(Kitchen Tips & Hacks)

रोज स्वच्छ करूनही किचन अस्वच्छ, कळकट दिसतं? ५ टिप्स ; नीटनेटकं, नवंकोर दिसेल किचन

१) स्वयंपाकघरातील टाइल्स स्वच्छ करण्यासाठी, साबण वापरून डिशवॉशिंग स्क्रबरने भिंती हलक्या हाताने घासून घ्या. नंतर एक स्वच्छ कापड पाण्यात भिजवून 2 ते 3 वेळा भिंती स्वच्छ करा. टाइल्स पूर्णपणे स्वच्छ आणि चमकदार असतील असे पाहा. फरशा स्वच्छ करण्यासाठी ब्लीच, अमोनिया, बेकिंग सोडा किंवा व्हिनेगर देखील वापरू शकता.

रोज स्वच्छ करूनही किचन अस्वच्छ, कळकट दिसतं? ५ टिप्स ; नीटनेटकं, नवंकोर दिसेल किचन

२) सिंक स्वच्छ करण्यासाठी आणि ग्रीसचे डाग काढून टाकण्यासाठी सिंकमधून गरम पाणी सोडा. यानंतर त्यात व्हिनेगर घाला आणि बेकिंग पावडरने सिंक स्वच्छ करा. सिंक नवीनसारखे चमकेल. नळाच्या टूथब्रशला साबण किंवा सर्फ लावून स्वच्छ करा.

रोज स्वच्छ करूनही किचन अस्वच्छ, कळकट दिसतं? ५ टिप्स ; नीटनेटकं, नवंकोर दिसेल किचन

३) किचनमध्ये ठेवलेला कचरा नेहमी स्वच्छ ठेवा आणि कचरापेटीत वापरण्यात येणारी पिशवी रोज बदला. फ्रीज स्वच्छ करण्यासाठी मग मध्ये कोमट पाणी घ्या आणि त्यात थोडासा बेकिंग सोडा घाला. आता हे बेकिंग सोडा मिश्रण मिळवून फ्रीज स्वच्छ करा. यामुळे फ्रीज व्यवस्थित स्वच्छ होईल आणि त्यात वाढणारे जंतूही मरतील.

रोज स्वच्छ करूनही किचन अस्वच्छ, कळकट दिसतं? ५ टिप्स ; नीटनेटकं, नवंकोर दिसेल किचन

४) किचन काऊंटर स्वच्छ करण्यासाठी तुम्ही व्हिनेगर आणि लिक्विड साबण वापरू शकता. यासाठी व्हिनेगर आणि लिक्विड सोप नीट मिक्स करून घाण झालेल्या कॅबिनेटवर घासून घ्या. आता एक स्वच्छ कापड घ्या आणि ते ओले करा आणि त्यासह काऊंटर स्वच्छ करा.

रोज स्वच्छ करूनही किचन अस्वच्छ, कळकट दिसतं? ५ टिप्स ; नीटनेटकं, नवंकोर दिसेल किचन

५) गॅसवरचे डाग काढून टाकण्यासाठी, क्लिनरने स्वच्छ करा किंवा बर्नर बाहेर काढून साबण आणि पाण्याने स्वच्छ करा. स्वयंपाकघरातील फरशी स्वच्छ करण्यासाठी, प्रथम जमिनीवर थोडासा ओल्या डिशवॉशिंग साबणाने जमिनीवर घासून घ्या. नंतर स्वच्छ करा. या उपायानं जमीन चमकू लागेल.

रोज स्वच्छ करूनही किचन अस्वच्छ, कळकट दिसतं? ५ टिप्स ; नीटनेटकं, नवंकोर दिसेल किचन

६) किचनमध्ये ठेवलेला मायक्रोवेव्ह स्वच्छ ठेवणे फार महत्वाचे आहे, यासाठी एका भांड्यात पाणी घेऊन त्यात लिंबाचा रस घाला. हा रस घालून मायक्रोवेव्ह सुरू करा आणि 5 मिनिटे चालू द्या. आता मायक्रोवेव्ह बंद करा, वाडगा काढा आणि पेपर टॉवेलने मायक्रोवेव्हची आतील बाजू स्वच्छ करा.