घर स्वच्छ करणारा झाडूच कळकट-घाणेरडा दिसतो? ४ टिप्स, एका मिनिटांत झाडू होईल स्वच्छ नव्यासारखा...
Updated:July 23, 2025 13:30 IST2025-07-23T06:54:45+5:302025-07-23T13:30:11+5:30
How To Clean Husk From Broom : easy way to clean husk stuck in broom : natural method to clean broom : smart hack to remove husk from broom : घराची स्वच्छता ठेवणाऱ्या झाडूला देखील वेळोवेळी स्वच्छ करणे गरजेचे असते...

घरातील साफसफाईसाठी दररोज वापरला जाणारा झाडू (How To Clean Husk From Broom) अनेकदा आपण साफ करायचाच विसरतो. पण या झाडूत धूळ, केस, जंतू आणि अनेक बॅक्टेरिया (easy way to clean husk stuck in broom) जमा होतात, जे घरात परत पसरू शकतात.
त्यामुळे घराची स्वच्छता ठेवणाऱ्या झाडूला देखील वेळोवेळी स्वच्छ (hack to remove husk from broom) करणे गरजेचे असते. यासाठीच, योग्य पद्धतीने आणि कमी वेळात झाडू स्वच्छ करण्याचे सोपे उपाय कोणते ते पाहूयात.
१. मिठाच्या पाण्याने झाडू स्वच्छ करा :-
या उपायासाठी एका बादलीत कोमट पाणी घ्या. त्यात ४ ते ५ चमचे पांढरे जाड मीठ मिसळा. आता झाडूचा झुपकेदार भाग या पाण्यात १५ मिनिटं भिजवून ठेवा. नंतर झाडू बाहेर काढून हलकं निचोळा आणि सूर्यप्रकाशात वाळत ठेवा. झाडू कोरडा झाल्यावर हलकं झाडल्यास त्यातील सगळी धूळ निघून जाईल आणि तो पूर्णपणे स्वच्छ होईल.
२. नारळाच्या तेलाने झाडूवरील घाण स्वच्छ करा :-
झाडू नळाखाली धरून पाण्याने नीट धुवून घ्या. नंतर त्यावर नारळाचे तेल लावून हलक्या हाताने पुसून घ्या. तेलाच्या चिकटपणामुळे झाडूवर चिकटलेली धूळ, कचरा आणि घाण सहज निघून जाते. नवीन झाडू घेतल्यानंतरसुद्धा त्यावर नारळाचे तेल लावल्यास त्याचा खालचा भाग अधिक काळ टिकतो आणि झाडू मजबूत राहतो त्याच्या काड्या वेगळ्या होत नाहीत.
३. जुना कंगवा वापरून झाडूतील घाण काढा :-
जर झाडूमधून खूप जास्त धूळ किंवा कचरा निघत असेल, तर जुन्या केसांच्या कंगव्याचा उपयोग आपण करु शकतो. झाडूच्या खालच्या भागात केसांप्रमाणे कंगवा फिरवा. त्यामुळे झाडूत अडकलेली धूळ, केस आणि माती सहज बाहेर निघते आणि झाडू स्वच्छ होतो. हा उपाय वेळ आणि मेहनत वाचवणारा आहे.
४. डिटर्जेंट आणि पाण्याने झाडू करा स्वच्छ :-
जर झाडू खूप जुना झाला असेल आणि त्यावर मातीचा थर बसलेला असेल, तर तो स्वच्छ करण्यासाठी उकळत्या पाण्यात डिटर्जेंट मिसळून एक द्रावण तयार करा. या पाण्यात झाडूचा खालचा भाग १० मिनिटं भिजवून ठेवा. नंतर स्वच्छ पाण्याने धुवून सुकवून घ्या. या पद्धतीने झाडूतील संपूर्ण घाण, धूळ आणि बॅक्टेरिया निघून जातील.