सिंकमध्ये, नळावर बोअरवेलच्या पाण्याचे पांढरे डाग पडले? १ सोपा उपाय- डाग जाऊन सिंक चमकेल

Updated:May 24, 2025 15:01 IST2025-05-24T14:53:31+5:302025-05-24T15:01:30+5:30

सिंकमध्ये, नळावर बोअरवेलच्या पाण्याचे पांढरे डाग पडले? १ सोपा उपाय- डाग जाऊन सिंक चमकेल

बोअरवेलच्या पाण्यामध्ये क्षाराचे प्रमाण खूप जास्त असते. त्यामुळे या पाण्याचे पांढरट डाग सिंकवर, नळावर पडतात.(how to clean hard water stains on sink and tab?)

सिंकमध्ये, नळावर बोअरवेलच्या पाण्याचे पांढरे डाग पडले? १ सोपा उपाय- डाग जाऊन सिंक चमकेल

अशा पांढरट डागाचे सिंक आणि नळ खूप अस्वच्छ, घाण दिसतात. शिवाय साध्या साबणाने घासून हे डाग निघतही नाहीत.(3 simple tricks to clean white stains on sink and tab)

सिंकमध्ये, नळावर बोअरवेलच्या पाण्याचे पांढरे डाग पडले? १ सोपा उपाय- डाग जाऊन सिंक चमकेल

म्हणूनच आता हा एक सोपा घरगुती उपाय पाहा. हा उपाय केल्याने सिंक आणि नळ अगदी चकाचक होईल. यासाठी आपल्याला एक बटाटा लागणार आहे. बटाटा घ्या आणि तो मधोमध अर्धा कापा.

सिंकमध्ये, नळावर बोअरवेलच्या पाण्याचे पांढरे डाग पडले? १ सोपा उपाय- डाग जाऊन सिंक चमकेल

अर्ध्या कापलेल्या बटाट्यावर चमचाभर बेकिंग सोडा घाला. आता असा बेकिंग सोडा घातलेला बटाटा सिंकवर, नळांवर घासून ते स्वच्छ करा. अगदी काही मिनिटांतच सिंक चकाचक होईल.

सिंकमध्ये, नळावर बोअरवेलच्या पाण्याचे पांढरे डाग पडले? १ सोपा उपाय- डाग जाऊन सिंक चमकेल

सिंकवरचे डाग स्वच्छ करण्यासाठी तुम्ही व्हिनेगर आणि बेकिंग सोडा असं मिश्रणही वापरू शकता. जर तुमच्याकडे व्हिनेगर नसेल तर लिंबाचा रस घेतला तरी चालेल.

सिंकमध्ये, नळावर बोअरवेलच्या पाण्याचे पांढरे डाग पडले? १ सोपा उपाय- डाग जाऊन सिंक चमकेल

टॉयलेट, बाथरुम घासण्यासाठी आपल्याकडे हार्पिक असतेच. हार्पिक वापरूनही नळ आणि सिंक अगदी स्वच्छ चमकवता येते. पण हार्पिकचा वापर थोडा सांभाळून करावा. घासताना ते हाताला लागू नये म्हणून हातात ग्लॉव्ह्ज घाला आणि मगच स्वच्छता करा. अगदी एका मिनीटांत नळ, सिंक चमकेल.