शर्ट पांढराशुभ्र आणि कॉलर मात्र कळकट्ट? हा घ्या उपाय, न घासता कॉलर होईल चकाचक..

Updated:March 18, 2026 13:34 IST2026-03-18T13:27:13+5:302026-03-18T13:34:34+5:30

शर्ट पांढराशुभ्र आणि कॉलर मात्र कळकट्ट? हा घ्या उपाय, न घासता कॉलर होईल चकाचक..

बऱ्याचदा असं होतं की शर्टच्या कॉलर एवढ्या घाण होऊन जातात की त्या स्वच्छ करणं खूप अवघड होतं.(home hacks to clean dirty collar of shirt)

शर्ट पांढराशुभ्र आणि कॉलर मात्र कळकट्ट? हा घ्या उपाय, न घासता कॉलर होईल चकाचक..

सध्या तर उन्हाळ्याचे दिवस आहेत. या दिवसांत खूप घाम येतो आणि त्यामुळे कॉलर अगदी अस्वच्छ होऊन जाते. साध्या धुण्याने ही कळकट कॉलर स्वच्छ होत नाही. मग अशावेळी ती बराच वेळ देऊन घासत बसावी लागते.(2 ways to clean dirty shirt collar)

शर्ट पांढराशुभ्र आणि कॉलर मात्र कळकट्ट? हा घ्या उपाय, न घासता कॉलर होईल चकाचक..

हे सगळं टाळायचं असेल तर पुढे सांगितलेला एक उपाय करा. शर्टच्या कॉलर कितीही घाण असल्या तरी अगदी ५ मिनिटांत स्वच्छ होतील. त्यासाठी सगळ्यात आधी तर मळालेली कॉलर पाण्यात भिजवून ओली करून घ्या. त्यावर तुमच्या घरातलं कोणतंही टुथपेस्ट ५ ते ७ मिनिटांसाठी लावून ठेवा.

शर्ट पांढराशुभ्र आणि कॉलर मात्र कळकट्ट? हा घ्या उपाय, न घासता कॉलर होईल चकाचक..

त्यानंतर त्यावर लिंबाचा रस लावून लिंबाचं सालंही त्यावर रगडा. यानंतर कपडे धुण्याच्या ब्रशने काॅलर घासून काढा. स्वच्छ पाण्याने धुवा. कॉलर अगदी स्वच्छ, चकाचक झालेली दिसेल.

शर्ट पांढराशुभ्र आणि कॉलर मात्र कळकट्ट? हा घ्या उपाय, न घासता कॉलर होईल चकाचक..

दुसरा उपाय करण्यासाठी व्हिनेगर आणि पाणी १ : ३ या प्रमाणात घ्या. त्यामध्ये खराब झालेली कॉलर ५ ते ६ मिनिटांसाठी बुडवून ठेवा.

शर्ट पांढराशुभ्र आणि कॉलर मात्र कळकट्ट? हा घ्या उपाय, न घासता कॉलर होईल चकाचक..

नंतर त्यावर बेकिंग सोडा आणि कोणतंही डिशवॉश लिक्विड लावा. यानंतर ब्रशने घासून काढा. कॉलर स्वच्छ झालेली दिसेल.