फक्त १ मिनिटांत चकचकीत चमकतील तांब्याची भांडी, घाईगडबडीत घासायची राहिली असेल तर हा घ्या उपाय

Updated:August 26, 2025 14:10 IST2025-08-26T09:43:10+5:302025-08-26T14:10:36+5:30

How To Clean Copper Utensils Easily (Homemade copper cleaner) : गणपतीच्या पुजेआधी तांब्याची भांडी स्वच्छ करण्याची खास ट्रिक पाहूया.

फक्त १ मिनिटांत चकचकीत चमकतील तांब्याची भांडी, घाईगडबडीत घासायची राहिली असेल तर हा घ्या उपाय

तुमच्या घरातही काही जुनी भांडी असतील ज्याची चमक कमी झाली असेल (Natural cleaning methods) आणि ते पूर्णपणे काळे पडले असेल. खासकरून पूजेची भांडी स्वच्छ करणं हे खूपच अवघड काम वाटतं. एकतर वेळ अजिबात नसतो एकावेळी बरीच कामं करायची असतात त्यात भांडी स्वच्छ करण्याचं अवघड काम सोपं कसं करायचं तेच कळत नाही.तांब्यांची भांडी काही मिनिटात चमकवण्यासाठी काही सोपे, प्रभावी उपाय पाहूया. (1 Minute Copper Utensils Cleaning Hacks)

फक्त १ मिनिटांत चकचकीत चमकतील तांब्याची भांडी, घाईगडबडीत घासायची राहिली असेल तर हा घ्या उपाय

किचनमध्ये ठेवलेला टोमॅटो सॉस भांडी चमकवण्यासाठी एक उत्तम उपाय आहे. यात सिट्रिक एसिड असते. ज्यामुळे तांब्याच्या भांड्यांवर जमा झालेला काळा जर निघून जातो.

फक्त १ मिनिटांत चकचकीत चमकतील तांब्याची भांडी, घाईगडबडीत घासायची राहिली असेल तर हा घ्या उपाय

तांब्याच्या भांड्यांवर तुम्ही टोमॅटो सॉस थेट लावू शकता. फक्त एका स्वच्छ कापडानं किंवा टुथब्रशनं सॉस घ्या. नंतर तांब्याच्या भांड्यावर लागलेला थर रगडून घ्या. काही सेंकंदात तुम्हाला फरक दिसेल. जसजसं रगडाल तसं काळा थर निघून जाईल आणि तांब्याच्या भांड्यांची चमक परत येईल.

फक्त १ मिनिटांत चकचकीत चमकतील तांब्याची भांडी, घाईगडबडीत घासायची राहिली असेल तर हा घ्या उपाय

हट्टी डाग काढून टाकण्यासाठी मीठ आणि व्हिनेगर हा उत्तम पर्याय आहे. ज्यामुळे जास्त मेहनत लागणार नाही. मीठ आणि व्हिनेगरचं मिश्रण परीणामकारक ठरतं. यात एसिटीक एसिड असते. या दोन्हींमुळे सफाई आणि पॉलिशिंग ही दोन्ही कामं होतात.

फक्त १ मिनिटांत चकचकीत चमकतील तांब्याची भांडी, घाईगडबडीत घासायची राहिली असेल तर हा घ्या उपाय

एका वाटीत १ चमचा मीठ आणि २ चमचे व्हिनेगर मिसळून एक घट्ट मिश्रण तयार करा. नंतर हे मिश्रण तांब्याच्या भांड्यांवर लावा. या मिश्रणानं लागलेले तांब्याचे डाग सहज निघून जातील.

फक्त १ मिनिटांत चकचकीत चमकतील तांब्याची भांडी, घाईगडबडीत घासायची राहिली असेल तर हा घ्या उपाय

तांब्याची भांडी साफ केल्यानंतर एका स्वच्छ मऊ कापडात ठेवा. जेणेकरून त्यावर डाग लागणार नाही. या 2 सोप्या पद्धतीनी तुम्ही भांड्यांवरचे डाग सहज काढू शकता.