किचन सिंकमध्ये पाणी तुंबून राहते- घाण अडकते? ४ उपाय, दुर्गंधी होईल गायब- सिंक चमकेल नव्यासारखे
Updated:September 4, 2025 16:55 IST2025-09-04T16:52:10+5:302025-09-04T16:55:12+5:30
kitchen sink cleaning: clogged sink solution: remove bad odor from sink: जर आपल्यालाही या समस्येला वारंवार सामोरे जावे लागत असेल तर हे ४ सोपे उपाय करुन पाहा.

स्वयंपाकघरातील फरशी आणि शेल्फ सहज स्वच्छ होतात पण सिंक स्वच्छ करण्याची वेळ येते तेव्हा घाण पाहून आपल्याला किळसवाणे वाटते. ज्यामुळे दररोज चिकटपणा वाढतो आणि बुरशी जमा होऊ लागते. (kitchen sink cleaning)
स्वयंपाकाचे तेल, मसाले किंवा भांडी धुतल्यानंतर जमा होणारी चिकट घाण सिंकची चमक कमी करते. यामुळे स्वयंपाकघरासह सिंक देखील खराब होतो. त्यात अन्नपदार्थ साठल्याने पाणी तुंबून राहाते. जर आपल्यालाही या समस्येला वारंवार सामोरे जावे लागत असेल तर हे ४ सोपे उपाय करुन पाहा. (clogged sink solution)
सिंकला गरम पाण्याने पूर्णपणे भरा. यामुळे घाण आणि तेल सहज निघून जाण्यास मदत होईल. ज्यामुळे साफसफाई करण्यास सोपे जाईल.
यात ४ चमचे बेकिंग सोडा, अर्धा कप व्हिनेगर आणि डिटर्जंट घाला. हे मिश्रण चिकट घाण आणि हट्टी डाग काढण्यास मदत करते.
मिश्रण कमीत कमी १० मिनिटे सिंकमध्ये ठेवा. यामुळे बेकिंग सोडा आणि व्हिनेगरच्या रासायनिक क्रियेमुळे घाण निघून जाईल आणि डाग सहज निघतील.
अर्धा लिंबू कापून त्यावर थोडे मीठ शिंपडा आणि ते सिंकवर घासा यामुळे तेलाचे किंवा चिकट डाग निघतील तसेच दुर्गंधी देखील कमी होईल.
२-३ चमचे बेकिंग सोडा घ्या आणि त्यात थोडे पाणी मिसळून पेस्ट बनवा. ही पेस्ट डागांवर लावा. स्पंज किंवा ब्रशने स्क्रब करा. ज्यामुळे किचन सिंक स्वच्छ होईल.