Join us   

दारासमोर - जिन्यात काढा गौरींची सुंदर सुबक पाऊले, काढायला सोप्या- दिसायला आकर्षक डिझाईन्स

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2023 9:21 AM

1 / 6
महालक्ष्मीचा किंवा गौरीच्या सणाच्या दिवशी घराबाहेर गेटजवळ, जिन्यात तसेच महालक्ष्मी किंवा गौरी जिथे बसवतो तिथे त्यांची पाऊलं काढली जातातच. रांगोळी कोणतीही काढली तरी या ३ दिवसांत गौरीच्या पाऊलांना मोठा मान असतो. म्हणूनच गौरींची पाऊलं कशी काढायची, त्याच्या या काही खास डिझाईन्स...
2 / 6
ही अगदी साधी- सोपी आणि झटपट होणारी पाऊलं. यासाठी तुमच्याकडे रांगोळीचे रंग नसतील तरी चालेल....
3 / 6
कोयरीच्या आकाराची ही पाऊलं दरवाज्याजवळ काढायला अतिशय सुबक, देखणी वाटतात. मध्ये रंग दिला की पाऊल अगदी भरल्यासारखे वाटते.
4 / 6
तुमच्याकडे खूप वेळ नसेल, झटपट पाऊलं काढायची असतील तर वर त्रिकोण आणि खाली गोल काढून बोटे काढण्याचे हे डिझाईन अगदी सोपे आणि कमी वेळात होणारे आहे.
5 / 6
हे काही डिझाईन्स बघून घ्या. पण हे डिझाईन्स काढायला तुमच्याकडे थोडा निवांत वेळ असायला हवा. कारण पाऊलांचा आकार परफेक्ट येणं गरजेचं आहे.
6 / 6
झटपट आणि कमी वेळेत काढायचे झाल्यास या काही पाऊलांचा विचारही तुम्ही करू शकता. ही पाऊलं काढण्यासाठीही तुमच्याकडे रांगोळीचे रंग असायलाच पाहिजेत असे काही नाही.
टॅग्स : सोशल व्हायरलगणेशोत्सव