ढोल- ताशे वाजवून गणरायाच्या स्वागताला सज्ज मराठी कलावंत, बघा ढोल- पथकातील त्यांचा दणकेबाज सहभाग
Updated:August 25, 2022 13:01 IST2022-08-25T12:52:42+5:302022-08-25T13:01:44+5:30

महाराष्ट्राचं लाडकं दैवत म्हणजेच गणपती बाप्पांचं आगमन आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलं आहे. बाप्पांचं स्वागत दणदणीत व्हावं, यासाठी महाराष्ट्रातील लहान- मोठ्या सगळ्याच शहरातील ढोल पथकं मागील महिना भरापासून कसून सराव करत आहेत.
ढोल पथकांतील प्रत्येक सदस्याकडे असा काही उत्साह असतो की तो नकळतपणे ढोलवादन बघणाऱ्याच्याही अंगात शिरतो आणि मग ढोल- ताशांच्या तालावर बघणाराही आपोआप थिरकू लागतो.
या ढोल पथकांचा उत्साह आणखी वाढविण्याचे काम करतात काही मराठी कलावंत. अनेक मराठी कलावंतांना ढोल पथकांत सहभागी व्हायला आवडते. त्यांचा या पथकांतील उत्साहपूर्ण वावर, त्या- त्या पथकांची शोभा निश्चितच वाढविणारा असतो.
ढोल पथकांमध्ये नेहमीच दिसणारा एक अतिशय गोड चेहरा म्हणजे अभिनेत्री श्रुती मराठे. नाकात नथ, मोठी चंद्रकोर, डोक्यावर फेटा अशा थाटांत श्रुती जेव्हा ढोल हातात घेते, तेव्हा ती आणखीनच लाघवी दिसते.
अभिनेता सौरभ गोखले हा देखील अनेकदा ढोल पथकांमध्ये दिसून आला आहे.
त्याचप्रमाणे अभिनेता आस्ताद काळे याचा ढोल पथकातील ॲग्रेसिव्ह पण तेवढाच उत्साहपूर्ण वावर अतिशय मोहक असतो. या सगळ्या सेलिब्रिटींना ढोल वाजवताना पाहणे म्हणजे त्यांच्या चाहत्यांसाठी जणू खास पर्वणी असते.
अभिनेता सुयश टिळकही यात मागे नाही. अनेकदा तो देखील ढोल पथकांमधून सहभागी झालेला दिसून आला आहे.
श्रुती प्रमाणेच अभिनेत्री तेजस्विनी पंडित ही देखील ढोल पथकांत बऱ्याचदा दिसून येते. ढोल पथकासाठी आवश्यक असणारी खास वेशभुषा करून ती जेव्हा तयार होते, तेव्हा खरोखरंच खूपच छान दिसते.
याशिवाय अभिनेता सुशांत शेलार, अमेय वाघ हे देखील काही वेळा ढोल वादन करताना दिसून आले आहेत.