फरशी पुसताना पाण्यात टाका २ गोष्टी, मुंग्या -माश्या-झुरळं जातील पळून, लादी चमकेल नव्यासारखी
Updated:May 6, 2025 17:47 IST2025-05-06T17:43:55+5:302025-05-06T17:47:02+5:30
floor cleaning hacks for summer: mopping water ideas for pest control: फरशी पुसताना अनेकदा आपण बाजारात मिळणाऱ्या रसायनांचा वापर करतो. परंतु, काही घरगुती उपाय केल्यास मुंग्या-झुरळ आणि मच्छरांपासून आपली सुटका होईल.

उन्हाच्या तडाख्यामुळे अनेकदा घरामध्ये मुंग्या येतात. बेसिंगच्या सिंकमध्ये पाणी तंबून राहिल्यामुळे मच्छर किंवा झुरळ घरभर फिरू लागतात. (floor cleaning hacks for summer)
अनेकदा कचऱ्याचा डबा, बाथरुम किंवा फरशीमध्ये फट तयार झाली असेल तर मुंग्या आपले घर करुन राहतात. उन्हाळ्यामध्ये मुंग्या सहज घरात पाहायला मिळतात. कितीही काहीही केले तरी मच्छर आणि मुंग्यांपासून आपली सुटका होत नाही. (mopping water ideas for pest control)
फरशी पुसताना अनेकदा आपण बाजारात मिळणाऱ्या रसायनांचा वापर करतो. परंतु, काही घरगुती उपाय केल्यास मुंग्या-झुरळ आणि मच्छरांपासून आपली सुटका होईल. (natural floor cleaner for flies and ants)
आपण फरशी रोज पुसायला हवी. त्यामध्ये रासायनिक कीटकनाशके आणि फरशी स्वच्छ करणारे द्रव घालण्याऐवजी पुसण्याच्या पाण्याच तुरटी आणि लिंबाचा रस मिसळा.
तुरटी वापरल्याने कीटक लगेच मरतात. यामध्ये अँटीबॅक्टेरियल गुणधर्म आहेत. ज्यामुळे फरशी पुसताच कीटक, माश्या, मुंग्या आणि झुरळ पळून जाईल.
तुरटी आणि लिंबाच्या रसाचा स्प्रे तयार करा. घराच्या कोपऱ्यात किंवा सिंकमध्ये याची फवारणी करा. यामुळे मुंग्या किंवा झुरळ घरात फिरणार नाही.
नियमितपणे लादी पुसत असाल तर या गोष्टींचा वापर करा. हे नैसर्गिक कीटकनाशक म्हणून काम करते. ज्यामुळे आपले घर जंतूमुक्त राहिल.