मोबाइल वापरता पण ‘हे’ फिचर्सच माहिती नाहीत? मोक्याच्या क्षणी तुमचा मोबाइलही दगा देऊ शकतो..

Updated:June 2, 2025 19:09 IST2025-06-02T19:02:12+5:302025-06-02T19:09:44+5:30

Do you use a mobile phone but don't know about 'these' features? see some important features : मोबाइल वापरताना या काही गोष्टी लक्षात ठेवा. तुमच्या फोनमध्ये असलेल्या महत्वाच्या फिचर्सबद्दल जाणून घ्या.

मोबाइल वापरता पण ‘हे’ फिचर्सच माहिती नाहीत? मोक्याच्या क्षणी तुमचा मोबाइलही दगा देऊ शकतो..

अन्न वस्त्र निवारा या मूलभूत गरजा आहेत, असे आपण जरी शिकलो असलो तरी आता त्यात मोबाइल हा चौथा घटक सामिल झाली आहे. मोबाइल वापरत नाही असे नेमकेच कोणी असेल. नव्या पिढीत तर मोबाइलशिवाय पानच हलत नाही. मोबाइल फार गरजेचे उपकरण झाले.

मोबाइल वापरता पण ‘हे’ फिचर्सच माहिती नाहीत? मोक्याच्या क्षणी तुमचा मोबाइलही दगा देऊ शकतो..

मोबाइलमध्ये अनेक फिचर्स असतात. त्यातील काही आपल्याला माहिती असतात. रोजच्या वापराचे अॅप्स असतील किंवा मोबाइलचे इनबिल्ट काही ठराविक फिचर्स असतील. ते आपण कायम वापरतो.

मोबाइल वापरता पण ‘हे’ फिचर्सच माहिती नाहीत? मोक्याच्या क्षणी तुमचा मोबाइलही दगा देऊ शकतो..

मात्र काही फिचर्स असे असतात, जे फार उपयुक्त असतात. मोबाइलमध्ये इन बिल्टही असतात. मात्र आपल्याला त्यांची काहीच माहिती नसते. ते कधीही वापरले जात नाहीत. असे काही फिचर्स जाणून घ्या. जे तुमच्या नक्की कामी येतील.

मोबाइल वापरता पण ‘हे’ फिचर्सच माहिती नाहीत? मोक्याच्या क्षणी तुमचा मोबाइलही दगा देऊ शकतो..

मोबाइलला नाईट लाईट असे एक फिचर असते. ते ऑन असेल तर स्क्रिनचा नीळा प्रकाश कमी होतो. त्यामुळे रात्री मोबाइल बघताना डोळ्यांना जास्त त्रास होत नाही. झोपेवरही परिणाम होत नाही. सेटिंग्सच्या डिस्प्ले या सेक्शनमध्ये हे फिचर असते.

मोबाइल वापरता पण ‘हे’ फिचर्सच माहिती नाहीत? मोक्याच्या क्षणी तुमचा मोबाइलही दगा देऊ शकतो..

डिजिटल वेलबिइंग हे फिचर तर सगळ्यांनी वापरायलाच हवे. डिजिटल वेलबिइंग अॅण्ड पॅरेंटल कंन्ट्रोल या सेक्शनमध्ये हे उपलब्ध असते. दिवसातून किती तास मोबाइल पाहिला आणि कोणता अॅप सगळ्यात जास्त वापरला हे पाहता येते.

मोबाइल वापरता पण ‘हे’ फिचर्सच माहिती नाहीत? मोक्याच्या क्षणी तुमचा मोबाइलही दगा देऊ शकतो..

इतरांच्या हातात फोन देताना जरा भीती वाटते. अशावेळी गेस्ट मोड हे फिचर उपयुक्त ठरते. वैयक्तिक माहिती कोणाला मिळू नये म्हणून दुसऱ्यांच्या हातात फोन देण्याआधी गेस्ट मोड ऑन करायचा. मल्टिपल युजर्स या सेक्शनमध्ये हे फिचर उपलब्ध असते.

मोबाइल वापरता पण ‘हे’ फिचर्सच माहिती नाहीत? मोक्याच्या क्षणी तुमचा मोबाइलही दगा देऊ शकतो..

काही फोनमध्ये क्विक टॅप हा पर्याय असतो. सगळ्या मोबाइलमध्ये उपलब्ध नसतो. हे फिचर अॅक्टीव्ह केल्यावर फोनच्या मागील बाजूला डबल टॅप करुन काही क्रिया करता येतात. जसे की स्क्रिनशॉट घेणे.

मोबाइल वापरता पण ‘हे’ फिचर्सच माहिती नाहीत? मोक्याच्या क्षणी तुमचा मोबाइलही दगा देऊ शकतो..

काही महत्वाचे काम करताना स्क्रिन सारखी बंद होते. सारखे टॅप करावे लागते. अशावेळी स्टे अवेक हे फिचर वापरायचे. ते अॅक्टिव्ह केल्यावर स्क्रिन सतत चालू राहते.