पणत्यांचे हे ६ प्रकार माहिती आहेत का? बाजारात मिळत आहेत मस्त आकर्षक प्रकार, घर दिसेल सुंदर
Updated:October 19, 2025 15:54 IST2025-10-19T15:49:56+5:302025-10-19T15:54:58+5:30
Do you know these 6 types of diya? they will make your house look beautiful : दिवाळीत लावा सुंदर पणतीचे प्रकार. घराची वाढेल शोभा.

दिवाळी म्हटली की पणत्या ही सर्वात महत्त्वाची गोष्ट. घराच्या प्रत्येक कोपर्यात उजेड पसरवणाऱ्या या पणत्या केवळ प्रकाश देत नाहीत, तर सणाला पारंपरिक आणि आकर्षक रुपही देतात. आजकाल पणत्यांचे अनेक प्रकार बाजारात दिसतात.
मातीच्या पणत्या:
या पणत्या पारंपरिक स्वरुपात सर्वात जास्त वापरल्या जातात. मातीपासून केलेल्या पणत्या तेल आणि वात घालून पेटवल्या जातात. यांचा मंद, उबदार प्रकाश घरात शांतता आणि समाधान आणतो.
रंगवलेल्या पणत्या:
साध्या मातीच्या पणत्या रंग, चमकदार रंगीत मणी किंवा ग्लिटरने सजवून रंगवल्या जातात. या पणत्या आकर्षक दिसतात आणि दिवाळीच्या सजावटीसाठी मस्त ठरतात.
पाण्यावरच्या पणत्या:
या पणत्या पाण्यावर तरंगतात. मोठ्या भांड्यात किंवा पाण्याच्या वाटीत पाण्याच्या पृष्ठभागावर या पणत्या ठेवतात. त्यातला उजेड पाण्यात प्रतिबिंबित होतो आणि एक सुंदर वातावरण तयार करतो.
लाईटवाल्या पणत्या:
आधुनिक काळात या इलेक्ट्रिक पणत्या खूप लोकप्रिय झाल्या आहेत. त्यात तेल किंवा वात लागत नाही; फक्त बॅटरी किंवा वीज जोडली की त्या चमकतात. सुरक्षित आणि पुन्हा वापरण्याजोग्या असल्यामुळे या सोयीच्या असतात.
सुगंधी पणत्या:
या पणत्यांमध्ये मेणात सुगंधी तेल मिसळलेले असते. पेटवल्यावर त्या प्रकाशाबरोबर हलका सुगंधही पसरवतात. यामुळे घरातील वातावरण शांत आणि प्रसन्न होते.
पाण्यावर चालणाऱ्या पणत्या :
पणतीमध्ये पाणी ओतायचे आणि त्यावर ती पणती पेटते अशा टेक्नोलॉजीने तयार केलेल्या पणत्या आजकाल मिळतात. वापरायला सोप्या असतात. तसेच पाणी काढल्यावर बंद होतात.