प्रत्येक धुण्यात कॉटनच्या कपड्यांचा रंग जातो? २ पदार्थ वापरून धुवा- जुने झाले तरी रंग उडणार नाही
Updated:November 5, 2024 16:25 IST2024-11-05T16:19:24+5:302024-11-05T16:25:41+5:30

कॉटनच्या कपड्यांचा धुतल्यानंतर रंग जातो. बऱ्याचदा तर असं होतं की आपण जितक्यावेळा कपडे धुतो, तितक्यावेळा त्यांचा रंग जातो. त्यामुळे मग ते कपडे लवकरच भुरकट, जुनाट दिसू लागतात.
म्हणूनच कॉटनच्या कपड्यांचा रंग उडून ते जुनाट दिसू नयेत म्हणून हा उपाय करून पाहा. अगदी जुने झाले तरी कपड्यांचा रंग जशास तसाच राहील.
हा उपाय करण्यासाठी एका बादलीमध्ये थंड पाणी घ्या. साधारण ५ ते ७ लीटर पाणी असेल तर त्यामध्ये १०० ग्रॅम तुरटी टाका.
त्याच पाण्यामध्ये १०० ग्रॅम मीठ टाका. त्यानंतर तुरटी आणि मीठ वितळेपर्यंत पाणी हलवत राहा.
यानंतर कॉटनचा कपडा त्या पाण्यात बुडवा आणि २ तासांसाठी तसाच भिजवून ठेवा. यावेळी त्या कपड्याचा थोडाफार रंग निघू शकतो. त्यानंतर तो कपडा पाण्यातून काढा आणि सावलीमध्ये वाळत टाका.
वरील प्रक्रिया झाल्यानंतर जेव्हा तुम्ही पुन्हा तो कपडा धुवाल, तेव्हा त्याचा रंग मुळीच जाणार नाही. एकदा हा प्रयोग करून पाहा.