Join us   

दिवाळीत घर सजवण्याच्या ८ सोप्या-सुंदर आणि झटपट आयडिया, आलेले पाहुणेही करतील कौतुक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2023 2:34 PM

1 / 9
दिवाळी म्हटली की आपण घराची साफसफाई करतो, घरातील जुन्या झालेल्या गोष्टी बदलतो आणि घराची छान सजावट करतो. दिवाळीत फराळाला किंवा जेवायला पाहुणे येणार असतील तर घर झटपट सजवण्यासाठी काही सोप्या आयडीया पाहूया (Diwali Home Decoration Ideas)...
2 / 9
अशाप्रकारची धातूची, काचेची अशी कोणतीही हंडी असेल तर त्यामध्ये फुलं, दिवे आणि शोभेच्या वस्तू घालून ते एखाद्या टेबलवर किंवा दारापाशी ठेवले तर खूप छान दिसते.
3 / 9
घराचा प्रवेश थोडा मोठा असेल तर अशाप्रकारे आकाशकंदिल, फुलांची रांगोळी आणि लायटींग यांचा वापर करुन पारंपरिक पद्धतीने डेकोरेशन करता येते.
4 / 9
घरात सहज उपलब्ध असणाऱ्या साड्या, ओढण्या यांचा वापर करुन असे रंगबिरंगी डेकोरेशन केले तर घराचा लूकच बदलून जातो. ग्लासमध्ये पाण्यात तेल घालून त्यावर ठेवलेले दिवे घराची शोभा नक्कीच वाढवतात.
5 / 9
फुलांची रांगोळी आणि त्यात पारंपरीक मातीच्या पणत्या किंवा मेणाचे दिवे ही जुनी आयडीया असली तरी ती कायम खुलूनच येते. विविध रंगांची फुले आणि पाने आपण यासाठी नक्की वापरु शकतो.
6 / 9
आपल्या घराच्या दाराबाहेर किंवा दारातून आत आल्यावर जास्त जागा नसेल तर घराचे कोपरे अशाप्रकारच्या लहान पण आकर्षक फुलांच्या रांगोळीने सजवता येतात. गडद रंगाची फुले वापरल्यास त्याकडे आवर्जून लक्ष जाते.
7 / 9
पारंपरीक पणत्यांबरोबरच हल्ली बाजारात भिंतीवर किंवा गॅलरीत लटकवता येतील असे दिव्यांचे बरेच प्रकार मिळतात. या दिव्यांची रचना इतकी सुंदर असते की अंधारात ते लावल्यास त्यातून मस्त डीझआईन तयार होते. असे दिवे घराचा लूक नक्की बदलू शकतात.
8 / 9
बाजारात मिळणाऱ्या स्वस्तात मस्त गोष्टींपासून घराची एखादी भिंत आपल्याला अतिशय छान पद्धतीने सजवता येते. त्यासाठी थोडीशी कल्पक दृष्टी मात्र असायला हवी.
9 / 9
बाजारात जायला वेळ नसेल तर ऑनलाईनही लाकडी, अॅक्रेलिक प्रकारातील दिव्यांचे आकर्षक प्रकार आपण खरेदी करु शकतो. हे दिवे खिडकीत, गॅलरीत टांगले की अतिशय सुंदर दिसतात.
टॅग्स : दिवाळी 2023सोशल व्हायरल