Diwali 2025 : दिवाळीच्या साफसफाईसाठी पाहा ७ असरदार घरगुती उपाय, घराचा कानाकोपरा होईल लख्ख...

Updated:October 9, 2025 11:36 IST2025-10-07T19:39:40+5:302025-10-09T11:36:24+5:30

Diwali cleaning tips and tricks : Diwali home cleaning hacks : desi nuskhe for Diwali cleaning : घराची साफसफाई करण्यासाठी महागडे उपाय करण्यापेक्षा घरातीलच काही गोष्टींचा वापर करून, घर नव्यासारखे लख्ख करु शकतो.

Diwali 2025 : दिवाळीच्या साफसफाईसाठी पाहा ७ असरदार घरगुती उपाय, घराचा कानाकोपरा होईल लख्ख...

दिवाळीचा सण अवघ्या काही दिवसांवर आला आहे. दिवाळीपूर्वी घराघरात (Diwali cleaning tips and tricks) साफसफाई, स्वच्छता करुन घर अगदी लख्ख, चकचकीत केले जाते. घराची स्वच्छता करायची म्हटलं की आपण वेगवेगळ्या प्रकारचे महागडे क्लिनिंग लिक्विड, डिटर्जंट, साबण हमखास विकत आणतो.

Diwali 2025 : दिवाळीच्या साफसफाईसाठी पाहा ७ असरदार घरगुती उपाय, घराचा कानाकोपरा होईल लख्ख...

परंतु, घराची साफसफाई करण्यासाठी असे महागडे उपाय करण्यापेक्षा (Diwali home cleaning hacks) आपण घरातीलच काही गोष्टींचा वापर करून देखील घर नव्यासारखे लख्ख करु शकतो. हे नैसर्गिक उपाय घर फक्त स्वच्छ आणि चमकदारच ठेवणार नाहीत, तर हानिकारक जंतूं देखील स्वच्छ करण्यास मदत करतील.

Diwali 2025 : दिवाळीच्या साफसफाईसाठी पाहा ७ असरदार घरगुती उपाय, घराचा कानाकोपरा होईल लख्ख...

लिंबाचा रस आणि बेकिंग सोडा एकत्र मिसळून एक दाट पेस्ट तयार करा. या पेस्टचा वापर स्वयंपाकघरातील सिंक बाथरूमच्या फरशा आणि नळांवर असलेले डाग काढण्यासाठी करु शकता. लिंबामध्ये असलेले ॲसिड आणि बेकिंग सोड्यातील खास गुणधर्म हट्टी डागांनाही अगदी सहजपणे काढून टाकतात. हा उपाय कोणत्याही हानिकारक केमिकल्सयुक्त रसायनांशिवाय तुमच्या घरातील अनेक गोष्टी चमकदार करेल आणि एक ताजा सुगंधही घरभर दरवळेल.

Diwali 2025 : दिवाळीच्या साफसफाईसाठी पाहा ७ असरदार घरगुती उपाय, घराचा कानाकोपरा होईल लख्ख...

एक बादली पाण्यामध्ये एक कप व्हाईट व्हिनेगर मिसळून त्या पाण्याने फरशी पुसा. व्हाईट व्हिनेगर एक नैसर्गिक जंतुनाशक आहे, जे फरशीवर असलेले जंतू नष्ट करते आणि फरशीला चमकदार करते. यामुळे फरशीवरून येणारी कोणत्याही प्रकारची दुर्गंधी दूर करण्यास फायदेशीर ठरते.

Diwali 2025 : दिवाळीच्या साफसफाईसाठी पाहा ७ असरदार घरगुती उपाय, घराचा कानाकोपरा होईल लख्ख...

घरातील जुन्या आणि रंगाने फिक्या झालेल्या लाकडी फर्निचरवर थोडेसे मोहरीचे तेल (Mustard Oil) आणि मीठ (Salt) एकत्र मिसळून हलक्या हातांनी घासून घ्या. हे मिश्रण लाकडाला पोषण देते आणि त्याची नैसर्गिक चमक परत आणते. थोड्या वेळाने आपण पाहू शकता की, जुने फर्निचर देखील नव्यासारखे चमकदार दिसेल, ज्यामुळे घराचा लूक पूर्णपणे बदलून जाईल.

Diwali 2025 : दिवाळीच्या साफसफाईसाठी पाहा ७ असरदार घरगुती उपाय, घराचा कानाकोपरा होईल लख्ख...

सुकी कडुलिंबाची पाने एका कापडामध्ये बांधून किंवा थेट कपाट आणि स्वयंपाकघरातील कोपऱ्यांमध्ये ठेवा. कडुलिंब हे एक शक्तिशाली नैसर्गिक कीटकनाशक आहे. त्याच्या तिखट आणि उग्र वासामुळे कीटकांना, जसे की झुरळे आणि मुंग्यांना घरातून पळवून लावता येते. हा उपाय कोणत्याही रासायनिक स्प्रे शिवाय तुमच्या घरातील वातावरण शुद्ध आणि सुरक्षित ठेवतो.

Diwali 2025 : दिवाळीच्या साफसफाईसाठी पाहा ७ असरदार घरगुती उपाय, घराचा कानाकोपरा होईल लख्ख...

जर तुमच्या भिंतींवर किंवा दरवाजांवर हलके डाग असतील, तर बेसन आणि थोडीशी हळद एकत्र करून एक पेस्ट बनवा आणि ती डाग असलेल्या जागेवर लावा. ती पेस्ट काही वेळ सुकू द्या आणि नंतर एका ओल्या कापडाने पुसून घ्या. ही पेस्ट डागांना हलके करण्यास मदत करते आणि भिंतींना एक हलकीशी चमक देते.

Diwali 2025 : दिवाळीच्या साफसफाईसाठी पाहा ७ असरदार घरगुती उपाय, घराचा कानाकोपरा होईल लख्ख...

घरातील कोपऱ्यांमध्ये आणि कपाटांमध्ये (Almirahs) कापराचे (Camphor) काही तुकडे ठेवा. कापूर ओलावाशोषून घेतो, कीटकांना दूर ठेवतो इतकंच नाही तर त्याचा तीव्र आणि शुद्ध सुगंध संपूर्ण घरात पसरतो. यामुळे घरात एक सुखद वातावरण निर्माण होते.

Diwali 2025 : दिवाळीच्या साफसफाईसाठी पाहा ७ असरदार घरगुती उपाय, घराचा कानाकोपरा होईल लख्ख...

चांदी आणि पितळेच्या भांड्यांची चमक परत आणण्यासाठी, त्यांना गव्हाच्या पीठाने किंवा मुल्तानी मातीने घासून स्वच्छ करा. यामुळे भांड्यांवर साचलेली घाण सहज निघून जाऊन त्यांना चकचकीत चमकदार येतो.