Diwali 2025 : वसुबारसला पटापट काढा या खास रांगोळ्या; ८ रांगोळी डिजाईन्स, उठून दिसेल दरवाजा
Updated:October 12, 2025 16:34 IST2025-10-12T16:20:17+5:302025-10-12T16:34:38+5:30
Diwali 2025 : दिवाळीच्या पहिल्या दिवशी दारासमोर रांगोळी काढण्याची परंपरासुद्धा आहे. हा दिवस गाई आणि गुरांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस असतो.

दिवाळीची (Diwali 2025) सुरूवात होते ती वसुबारस (Vasubaras) सणाचे म्हणजे गोवत्स द्वादशी या सणाने. हा सण दिवाळीच्या आदल्या दिवशी साजरा केला जातो. (Vasubaras Rangoli Designs)
वसुबारस हा सण प्रामुख्यानं गाय आणि वासरू यांच्या पुजनासाठी योग्य मानला जातो. या सणाचे अध्यात्मिक आणि सांस्कृतिक महत्वसुद्धा आहे.
दिवाळीच्या पहिल्या दिवशी दारासमोर रांगोळी काढण्याची परंपरासुद्धा आहे. हा दिवस गाई आणि गुरांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस असतो.
रांगोळीच्या मध्यभागी गाय आणि तिच्याजवळ वासरू काढले जाते. गाईच्या कपाळावर टिळा आणि गळ्यात फुलांची माळ असं तुम्ही दाखवू शकता.
पांढरा रंग गाईसाठी, हिरवा शेतीसाठी, लाल-पिवळा पूजनासाठी तसंच इतर आकर्षक रंगसुद्धा वापरले जातात.
गाय आणि लक्ष्मीचे घरात आगमन दर्शवण्यासाठी मुख्य प्रवेशद्वाराजवळ किंवा तुळशी वृंदावनाजवळ गाईच्या पायांचे ठसे काढले जातात. हे ठसे विशेषत: पांढऱ्या रांगोळीनं किंवा हळदी कुंकवानं काढले जातात.
तुळशी वृंदावनाजवळ पणती, ओम, स्वास्तिक किंवा कलश यांचे डिजाईन्स काढले जातात.
रांगोळी मुख्यतवे घराच्या दारात किंवा तुळशी वृंदावनाजवळ काढा. गाईसाठी पांढरा किंवा फिकट रंग वापरल्यास ती अधिक आकर्षक दिसते. रांगोळीत लाल, पिवळा, हिरवा आणि केशरी रंगाचा जास्त वापर करा.