Wedding Decoration: लग्नकार्यात लागणाऱ्या ओटीच्या पिशव्या पॅक करण्यासाठी मस्त आयडिया- घरच्याघरीच आकर्षक सजावट
Updated:November 14, 2025 15:59 IST2025-11-14T15:55:05+5:302025-11-14T15:59:05+5:30

लग्नसमारंभात आलेल्या महिलांची ओटी भरणे हा एक मोठा कार्यक्रम असतो. गडबड होऊ नये म्हणून ओटीच्या पिशव्या पॅक करून आपल्या जातात आणि त्याच प्रत्येकीला दिल्या जातात.
पण आता त्यामध्येही खूप आकर्षक प्रकार आले असून आपण किती वेगवेगळ्या पद्धतीने ओटीच्या पिशव्या पॅक करू शकतो ते पाहा..
अशा प्रकारच्या बाहुल्या करूनही तुम्ही ओटी पॅक करू शकता.
ही एक सोपी आणि सुटसुटीत पद्धत. अशा पिशव्या तयार करायला खूप वेळही लागत नाही.
तुमच्याकडे मौंज असेल तर अशा प्रकारच्या बटूच्या आकाराच्या ओटीच्या पिशव्या तयार करता येतील.
हळकुंड वापरून आकर्षक फुलपाखरू तयार करण्याची ही पद्धतही अतिशय सोपी आहे.
खणाचा कपडा वापरून या पद्धतीनेही ओटीच्या पिशव्या पॅक करू शकता. त्यावर गिफ्ट म्हणून नथही देता येते.