बंगाली मेहेंदी डिझाइन्स पाहा! जणू हातावर बंगाली जादूच, एकेक डिझाइन दिसते सुंदर आणि मनमोहक
Updated:April 17, 2025 16:11 IST2025-04-17T16:02:17+5:302025-04-17T16:11:06+5:30
Check out Bengali Mehndi Designs! It's like Bengali magic on the hands : रोजच्या डिझाइनपेक्षा काही तरी वेगळे आणि भन्नाट. पाहा किती छान दिसते हातावरची मेहेंदी.

भारतातील प्रत्येक राज्याची काही तरी खासियत आहे. खाद्यसंस्कृती राज्यानुसार बदलते. तसेच पोशाखही वेगवेगळा असतो. परंपरा, पद्धती वेगळ्या तर असतात मात्र नाविन्यपूर्ण असतात.
अगदी मेहेंदी काढण्याचे प्रकारही वेगवेगळे असतात. पोइला बोइशाख हा बंगाली नववर्षाचा पहिला दिवस. त्यासाठी खास काही मेहेंदी डिझाइन आहेत. त्या दिवशीच काढायला हवे असे काही नाही. कारण डिझाइन फार सुंदर आहेत. तुम्ही कोणत्याही सणाला काढू शकता.
अगदी साधे सिंपल डिझाइन दिसायला छान दिसते. नृत्यांगना असे डिझाइन काढतात. तसेच बंगाली महिलांमध्ये फारच कॉमन आहे.
फार कष्ट न घेता काही मिनिटांमध्ये मेहेंदी काढायची असेल तर मग असे डिझाइन काढून घ्या. दिसते सुंदर लगेच रंगेलही.
लाल रंगाची मेहेंदी आणि पांढऱ्या रंगाचे डॉट हे कॉम्बिनेशन फार सुंदर दिसते. बोटे छान भरभरुन रंगवायची.
बंगाली मेहेंदी डिझाइनमध्ये फुलांचे विविध आकार काढले जातात. तसेच पांढऱ्या रंगाची मेहेंदही वापरली जाते.
लग्न समारंभासाठी खास नवरीसाठी हे महिलेचे चित्र मेहेंदीने हातावर रेखाटले जाते. चेहेर्या समोर असे पान धरण्याची बंगाली प्रथा आहे.
पायासाठीही बंगाली मेहेंदीच्या अनेक डिझाइन आहेत. बोटे लाल रंगाची आणि बरोबर पांढर्या रंगाचे डिझाइन अशी मेहेंदी फार सुंदर दिसते.
हे डिझाइन अगदीच सुंदर दिसते. गुलाबाच्या फुलांचे डिझाइन सगळ्यांच्याच हातावर फार छान दिसते.
काळी मेहेंदी व लाल मेहेंदी असे हे रंगीत डिझाइन फार आकर्षक दिसते. हात अगदी उठून दिसतो.