Join us   

अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेली एन्जॉय करतेय जपानची खास ट्रिप, पाहा सुंदर फोटो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2022 1:07 PM

1 / 8
१. बिग बी अमिताभ यांची नात म्हणजेच श्वेता बच्चन यांची लेक नव्या नवेली नंदा म्हणजे बी- टाऊनमधील स्टार किड्सपैकी एक ग्लॅमरस नाव. नव्या नेहमीच वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीजच्या माध्यमातून चर्चेत असते. आता मात्र गाजते आहे ती तिची जपान ट्रिप.
2 / 8
२. वडील निखिल नंदा यांच्यासोबत नव्या काही दिवस जपानमध्ये गेली होती. तिथे तिने काय काय एन्जॉय केलं, जपानच्या कोणत्या गोष्टी तिला आवडल्या, याचे काही फोटो तिने तिच्या इन्स्टाग्रामला शेअर केले आहेत.
3 / 8
३. जपानच्या क्योटो शहरात तिने बऱ्यापैकी वेळ घालवला. तिथली हिरवळ तिला विशेष आवडल्याचं दिसून येतं. अर्थातच कोणत्याही निसर्गप्रेमीला आवडेल असंच तिथलं वातावरण दिसत आहे.
4 / 8
४. तिथल्याच एका तलावाचा तिने शेअर केलेला हा फोटोही अतिशय सुंदर आहे. एकंदरीतच या फोटोंवरून नव्याला निसर्ग विशेष आवडत असावा, असं दिसतं.
5 / 8
५. किमोनो हा ट्रॅडीशनल जपानी ड्रेस घालून नव्याने बोटींग करण्याचा आनंदही घेतला. निळ्या रंगाचा किमोनो आणि हॅट अशा पेहरावात ती छानच दिसत होती.
6 / 8
६. कोणत्याही नव्या ठिकाणी गेल्यावर तिथली आणखी एक मजा म्हणजे त्या ठिकाणचे पारंपरिक पदार्थ खाणे. नव्यानेही जपान ट्रिपमध्ये तिचा हा आनंद अजिबात मिस केलेला नाही. तिथे जाऊन जपानच्या पारंपरिक पदार्थांचा तिने मनसोक्त आस्वाद घेतला.
7 / 8
७. ओसाका येथील कप नूडल्स म्युझियमलाही तिने भेट दिली. येथे अनेक प्रकारच्या नूडल्स असून आलेल्या पर्यटकांना इंस्टंट नूडल्सची माहितीही दिली जाते आणि त्याचा आस्वादही घेता येतो.
8 / 8
८. जपानच्या वेगवेगळ्या भागामध्ये जाऊन, ते भाग एक्सप्लोअर करण्याचा प्रयत्नही नव्याने केला.
टॅग्स : नव्या नवेलीअमिताभ बच्चनजपान