मळलेले पांढरे मोजे-शर्टची काळीकुट्ट कॉलर धुण्याची भन्नाट ट्रिक, ब्रशने घासायला नकोच-पाहा उपाय
Updated:August 8, 2025 14:51 IST2025-08-08T12:32:13+5:302025-08-08T14:51:29+5:30

लहान मुलांचे शाळेचे पांढरे सॉक्स खूप लवकर मळतात (cleaning tips for white socks). त्याचप्रमाणे पांढऱ्या किंवा फिक्या रंगाच्या शर्टच्या कॉलरही लवकर खराब होतात.
मळकट झालेले पांढरे सॉक्स किंवा कॉलर स्वच्छ करणे हे काम अनेक जणींना खूप अवघड आणि वेळ खाऊ वाटते.
म्हणूनच आता हा एक सोपा उपाय पाहा आणि अजिबात वेळ न घालवता किंवा ब्रशने न घासता शर्टची कॉलर किंवा पांढरे सॉक्स कसे स्वच्छ करायचे याची ही एक मस्त आयडिया पाहा.
हा उपाय करण्यासाठी एका बादलीमध्ये दोन ते तीन लीटर गरम पाणी घ्या. गरम पाण्यामध्ये एक चमचा बेकिंग सोडा घाला.
याच मिश्रणात आता २ टेबलस्पून व्हिनेगर, अर्धा चमचा डिटर्जंटही घाला.
सगळ्यात शेवटी त्या पाण्यामध्ये १ चमचा आपले नेहमीचे खाण्याचे मीठ घाला आणि सगळे पाणी व्यवस्थित हलवून घ्या.
आता या पाण्यामध्ये मळकट झालेले सॉक्स किंवा शर्टच्या कॉलरचा भाग भिजत घाला. दीड ते दोन तासांनी भिजवलेले सॉक्स पाण्याच्या बाहेर काढा. तेव्हा सॉक्सचा सगळा कळकटपणा निघून गेलेला दिसेल आणि न घासताही तुमचे सॉक्स अतिशय स्वच्छ झालेले असतील. हे सॉक्स पुन्हा एकदा स्वच्छ पाण्याने धुऊन घ्या. त्याच्यावरचा उरलासुरला मळही निघून जाईल.