वाळवी फर्निचर पोखरते आहे? ७ सोपे उपाय - वाळवी होईल नष्ट, लाकडी वस्तू मस्त...

Updated:April 11, 2025 10:17 IST2025-04-11T10:06:51+5:302025-04-11T10:17:09+5:30

7 Simple Remedies To Protect Home Wooden Furniture From The Termites Cleaning Tips For Furniture : 7 Effective Home Remedies to Get Rid of Termites : How To Get Rid Of Termites On Wooden Furniture : घरातील अनेक वस्तूंना वाळवी लागून त्या खराब होऊ नये यासाठी काही खास टिप्स..

वाळवी फर्निचर पोखरते आहे? ७ सोपे उपाय - वाळवी होईल नष्ट, लाकडी वस्तू मस्त...

काहीवेळा घरामधील अनेक वस्तूंना अचानक वाळवी (7 Effective Home Remedies to Get Rid of Termites) लागते. ही वाळवी एवढी भयानक असते की लाकडी कपाट, खूर्च्या, टेबल, कागदपत्र अशा सगळ्या वस्तू पोखरुन त्यांचे नुकसान करते.

वाळवी फर्निचर पोखरते आहे? ७ सोपे उपाय - वाळवी होईल नष्ट, लाकडी वस्तू मस्त...

जर घरात वाळवी लागली असेल तर सर्वात आधी घरातील लाकडाच्या वस्तू अवघ्या काही (7 Simple Remedies To Protect Home Wooden Furniture From The Termites) दिवसात पूर्णपणे खराब होऊ शकतात. तसेच वाळवीला वेळीच न रोखल्यास ती घरभर पसरण्याची भीती असते. यासाठी वाळवी रोखण्यासाठी काही टिप्स पाहूयात.

वाळवी फर्निचर पोखरते आहे? ७ सोपे उपाय - वाळवी होईल नष्ट, लाकडी वस्तू मस्त...

कडुलिंबाचे तेल कापसाच्या बोळ्याने फर्निचरला किंवा अडगळीच्या ठिकाणी नियमितपणे लावावे. याचबरोबर, हे तेल स्प्रे बॉटलमध्ये भरून तुम्ही फर्निचरवर स्प्रे सुद्धा करू शकता. कडुलिंबामधील ॲण्टी बॅक्टेरियल आणि ॲण्टीफंगल गुणधर्मांमुळे वाळवी नाहीशी होते.

वाळवी फर्निचर पोखरते आहे? ७ सोपे उपाय - वाळवी होईल नष्ट, लाकडी वस्तू मस्त...

फर्निचरला वाळवी लागू नये, म्हणून हा एक चांगला उपाय आहे. हा उपाय करण्यासाठी व्हिनेगर आणि लिंबाचा रस सम प्रमाणात घ्यावा. तो एका स्प्रे बॉटलमध्ये भरून ठेवा आणि नियमितपणे फर्निचरवर स्प्रे करा. यामुळे वाळवीचे प्रमाण कमी होईल.

वाळवी फर्निचर पोखरते आहे? ७ सोपे उपाय - वाळवी होईल नष्ट, लाकडी वस्तू मस्त...

कोरफडीच्या पानाचा ताजा गर घ्या आणि मिक्सरमधून फिरवून त्याची पातळ पेस्ट करा. ही पेस्ट वाळवी झालेल्या भागाला लावा. २- ३ दिवस सलग हा उपाय करा. वाळवी कमी होईल.

वाळवी फर्निचर पोखरते आहे? ७ सोपे उपाय - वाळवी होईल नष्ट, लाकडी वस्तू मस्त...

एक कप पाण्यात फक्त ६ ते ७ थेंब लवंगाचे तेल मिसळा आणि वाळवीच्या ठिकाणी स्प्रे करा. हा उपाय सलग २ ते ३ दिवस नियमित केल्याने वाळवी येण्याचे प्रमाण कमी होऊ शकते.

वाळवी फर्निचर पोखरते आहे? ७ सोपे उपाय - वाळवी होईल नष्ट, लाकडी वस्तू मस्त...

मिठाच्या मदतीने वाळवी अगदी सहज मारली जाऊ शकते. वाळवीची लागण झालेल्या ठिकाणी मीठ टाकून ते २ ते ३ दिवस तसेच राहू द्या. यामुळे वाळवी सहज मारली जाईल.

वाळवी फर्निचर पोखरते आहे? ७ सोपे उपाय - वाळवी होईल नष्ट, लाकडी वस्तू मस्त...

पुठ्ठयाच्या बॉक्सचा येणारा उग्र वास वाळवी आवडत नाही. हा उपाय करण्यासाठी फक्त पुठ्ठा घ्या, वास वाढवण्यासाठी तो थोडासा ओला करा आणि जिथे वाळवी आहे तिथे ठेवा. यामुळे वाळवी कमी होण्यास मदत होईल.

वाळवी फर्निचर पोखरते आहे? ७ सोपे उपाय - वाळवी होईल नष्ट, लाकडी वस्तू मस्त...

बोरिक पावडर आणि पाणी एका बाटलीत मिसळा. ज्या भागावर वाळवी लागली आहे त्या भागावर मिश्रण पूर्णपणे शिंपडा. या उपायाने वाळवी कायमची नष्ट होण्यास मदत मिळते.