वधुवरांसाठी लग्नात हार हवेत स्पेशल; १० वरमाला डिझाइन्स, प्रत्यक्ष व फोटोतही हार दिसतील सुंदर
Updated:December 17, 2025 13:38 IST2025-12-17T13:15:30+5:302025-12-17T13:38:44+5:30
Wedding Varmala Designs For Lehenga : काही जोडपी फुलांसोबत जरदोरी वर्क, मोती किंवा वेलचीच्या माळांनाही पसंती देत आहे. ज्यामुळे रॉयल लूक मिळतो.

वधू-वरांसाठी लग्नातील वरमाला (Varmala Designs) हा आकर्षणाचा केंद्रबिंदु असतो. सध्याच्या ट्रेंडनुसार पारंपारीक झेंडूच्या फुलांऐवजी काही अधुनिक आणि पेस्टल रंगाच्या माळांना पसंती दिली जात आहे. Wedding Varmala Designs)
सध्या बेबी पिंक, पीच आणि व्हाईट रंगाच्या गुलाब आणि कार्नेशन फुलांच्या माला खूपच लोकप्रिय आहेत. हे रंग लग्नाच्या पोशाखांवर अतिशय शोभून दिसतात.
काही जोडपी फुलांसोबत जरदोरी वर्क, मोती किंवा वेलचीच्या माळांनाही पसंती देत आहे. ज्यामुळे रॉयल लूक मिळतो.
हलक्या वजनाच्या आणि नाजूक दिसणाऱ्या जिप्सी फुलांच्या माळा सध्या ट्रेंडींग आहेत. तसंच जांभळ्या किंवा पांढऱ्या ऑर्किड्सच्या माळा दीर्घकाळ ताज्या राहतात.
जर तुम्हाला पारंपारीक लूक हवा असेल तर सुवासिक मोगऱ्याच्या कळ्या आणि लाल गुलाबांचे कॉम्बिनेशन्स कधीही एव्हरग्रीन ठरतात.
साध्या वरमालांची किंमत १५०० रूपयांपासून ते ३ हजार रूपयांपर्यंत असते.
ऑर्किड किवा कार्नेशन फुलांचा वापर असेल तर ४ हजार ते ८ हजार किंमत असते.
प्रिमियम क्वालिटीच्या माळांची किंमत १० हजार रूपयांपेक्षा जास्त असते.
अशा वरमाला तुम्हाला जवळपासच्या फुल मार्केटमध्ये ताज्या बनवून मिळतील.
तुमच्या आऊटफिटच्या रंगानुसार कॉन्ट्रास्ट रंगाचे फुलांचे पॅटर्न्स निवडू शकता.