लग्नसमारंभात गळ्यात दिसेल शोभून लांब राजवाडी मंगळसूत्र, पाहा १० सुंदर डिझाइन्स एकदम घसघशीत
Updated:February 5, 2026 10:29 IST2026-02-04T12:04:22+5:302026-02-05T10:29:47+5:30
Wedding Season Special Rajwadi Mangalsutra Designs : इमिटेशन किंवा १ ग्रॅम गोल्डमध्ये याची किंमत साधारण १ हजार रुपयांपासून ५ हजार रुपयांपर्यंत आहे.

राजवाडी मंगळसूत्र (Rajwadi Mangalsutra) सध्या बरीच लोकप्रिय होत असून शाही लूकसाठी महिलांची पहिली पसंती मिळत आहे. (Wedding Season Special Rajwadi Mangalsutra Designs)
साडीवर ही मंगळसूत्र अत्यंत भरीव लूक देतात आणि शोभून दिसतात. राजवाडी मंगळसुत्रांमध्ये बरेच पॅटर्न्स तुम्हाला दिसून येतील. (Latest 10 Designs Of Rajwati Mangalsutra)
या मंगळसुत्रांचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे त्याचे मोठे आणि कलाकुलर असलेले हेवी पेंडंट. ज्यावर नाजूक नक्षीकाम किंवा मिनाकारी असते.
साध्या पिळ्या धमक सोन्याऐवजी मॅट फिनिश किंवा एंटीक गोल्ड लूक असलेल्या राजवाडी डिझाईन्सना जास्त मागणी आहे.
यामध्ये पारंपारीक वाट्यांच्या कडांना झुमका स्टाईल, लहान मणी किंवा नाजूक घुंगरू जोडलेले असतात. यामुले त्याला अधिक उठाव येतो.
हे मंगळसूत्र सहजा २ ते ४ पदरी काळ्या मण्यांच्या जाड माळेत किंवा सोन्याच्या मण्यांच्या मिश्रणात उपलब्ध असते.
पेडंटमध्ये लाल किंवा हिरव्या रंगाचे खडे वापरून त्याला पॅटर्ननमुसार रंगत दिली जाते.
इमिटेशन किंवा १ ग्रॅम गोल्डमध्ये याची किंमत साधारण १ हजार रुपयांपासून ५ हजार रुपयांपर्यंत आहे.
सोन्याचे राजवाडी मंगळसुत्रांची किंमत वजनानुसार असते. साधारण १० ग्रॅमच्या पुढील वजनासाठी ९० हजार रुपयांच्या वर खर्च येतो.
हे मंगळसूत्र कोणत्याही पैठणी, नऊवारी किंवा काठपदर साडीवर विशेष शोभून दिसतात. जरी हे मंगळसूत्र दिसायला हेवी वाटत असले तरी १ ग्रॅम गोल्डमध्ये अनेक हलके पर्याय उपलब्ध आहेत.