लग्नसराई स्पेशल : हिरव्या चुड्याचे १० युनिक- पारंपरिक बांगड्यांचे सेट्स, हातात शोभून दिसतो चुडा
Updated:February 3, 2026 19:00 IST2026-02-03T08:36:00+5:302026-02-03T19:00:33+5:30
Green Bangles Set Green Chuda Set (Hirva Chuda) : ज्यांना जास्त चमक आवडत नाही. त्यांच्यासाठी मॅट फिनिश असलेल्या गडद हिरव्या रंगाच्या बांगड्या सध्या खूपच चर्चेत आहेत.

कितीही वेगवेगळ्या डिझाईन्सच्या बांगड्या घातल्या तरी हिरवा चुडा घालण्याचा आनंद काही वेगळाच असतो. लग्नसराईत हिरव्या चुड्याला बरीच मागणी असते. (Green Chuda Set (Hirva Chuda)
हिरव्या रंगाच्या बांगड्यांच्या आजूबाजूला गोल्डन कड्यांचे से्टस चुड्याला नवीन लूक देतात. (Green Bangles Set)
साध्या हिरव्या बांगड्यांऐवजी तुम्ही मोतीवर्क किंवा सोनेरी नक्षीकाम, टिकल्या किंवा ग्लिटर असलेल्या बांगड्यांना पसंती देऊ शकता.
चुड्याच्या मध्यभागी कुंदनचे काम केलेले जाड कडे किंवा खड्यांच्या बांगड्या लावल्यानं हाताला एक रॉयल आणि भरगच्च लूक मिळतो.
हिरव्या बांगड्यांच्या दोन्ही बाजूंना मोत्याची डिझाईन असलेले कडे जोडल्यानं कडा अधिक उठावदार दिसतो. जो विशेषत: लग्न समारंभासाठी लोकप्रिय आहे.
काचेच्या बांगड्यांसोबत आता मेटलच्या हिरव्या बांगड्या आणि मखमली फिनिश असलेल्या बांगड्याही ट्रेंडमध्ये आहेत. ज्या टिकायला मजबूत असतात.
दक्षिण भारतीय पद्धतीची टेम्पल डिझाईन्सचे सोनेरी कडेही बांगड्यांसोबत एक पांरपाीरक आणि स्टायलिश लूक देतात.
ज्यांना जास्त चमक आवडत नाही. त्यांच्यासाठी मॅट फिनिश असलेल्या गडद हिरव्या रंगाच्या बांगड्या सध्या खूपच चर्चेत आहेत.
हिरवा रंग सौभाग्य आणि समृद्धीचे प्रतिक मानला जात असल्यानं सण-समारंभ अशा नवनवीन डिझाईन्सचा चुडा महिलांच्या सौंदर्यात अधिक भर घालतो.
तुम्ही जवळपासच्या नॉव्हेल्टी शॉपमधून किंवा वन ग्रॅम दागिन्यांच्या दुकानातून असे सुंदर डिझाईन्सचे कडे विकत घेऊ शकता.
काचेच्या बांगड्यांमध्येही तुम्हाला बरीच व्हरायटी दिसून येईल. या डिझाईन्सच्या बांगड्या तुम्ही लग्नकार्यात घालू शकता.