नवीन साड्यांवर शिवा हाय नेकचे फॅशनेबल ब्लाऊज; १० ट्रेंडीग पॅटर्न्स, साडीत उंच-स्लिम दिसाल
Updated:December 15, 2024 14:03 IST2024-12-15T13:42:22+5:302024-12-15T14:03:16+5:30
Trending High Neck Blouse Designs : हाय नेक ब्लाऊजमध्ये तुम्ही बोट नेक, कॉलर नेक, हॉल्टर नेक या प्रकारचे कोणतेही पॅटर्न्स शिवू शकता.

साडी पारंपारीक पोशाख असून साडी आणि ब्लाऊजच्या लूकमध्ये बरेच बदल गेल्या काही वर्षात दिसून येत आहेत. सुरूवातील गोल गळ्याचे साधे ब्लाऊज शिवले जायचे पण आता असे दिसून येत नाही.
ब्लाऊजच्या गळ्यांचे नवनवीन ट्रेंडीग पॅटर्न्स पाहूया. हे पॅटर्न्स तुम्ही कधीही साध्या साडीवर किंवा भरलेल्या साडीवरही ट्राय करू शकता.
हाय नेक ब्लाऊजमध्ये तुम्ही बोट नेक, कॉलर नेक, हॉल्टर नेक या प्रकारचे कोणतेही पॅटर्न्स शिवू शकता.
कॉन्ट्रास्ट रंगाचं ब्लाऊज, साडी असेल तर बंद गळ्याचे स्लिव्हजलेस ब्लाऊज शिवू शकता. पार्टीसाठी हा उत्तम आऊटफिट ठरेल.
जर साध्या साडीत रॉयल टच तुम्हाला हवा असेल तर तुम्ही फूल स्लिव्हज आणि क्लोज नेकचं ब्लाऊज शिवू शकता. क्रॉप टॉपप्रमाणे या ब्लाऊजची फिटिंग बसेल.
जर तुमच्याकडे नेटचे कापड असेल तर तुम्ही या प्रकारचं ब्लाऊज शिवू शकता. काळ्या रंगाचे नेटचे ब्लाऊज शिवले तर कोणत्याही साडीवर सूट होईल.
काठापदराच्या साडीवर युनिक लूक येण्यासाठी तुम्ही व्हाईट नेटचं बंद गळ्याचं ब्लाऊज शिवू शकता.
जर तुमची साडी नेटची असेल तर तुम्ही या पॅटर्नचं ब्लाऊज शिवू शकता.
कॉटन, शिफॉन साड्यांसाठी हे साधं बोट नेकचं पॅटर्न उत्तम आहे.
या ब्लाऊज पॅटर्न्समध्ये तुमचे दंड बारीक दिसतील आणि तुमची उंचीसुद्धा जास्त दिसेल.
अभिनेत्री अनेक कार्यक्रमांमध्ये बोट नेकचे ब्लाऊज घातलेल्या दिसून येतात. तुम्हीसुद्धा या पद्धतीचे ब्लाऊज शिवू शकता.