लग्नात जाताना नेसा ट्रेंडीग 'इलायची पैठणी'; ७ आकर्षक डिजाईन्स, साडीत शाही लूक मिळेल
Updated:December 3, 2025 14:07 IST2025-12-03T13:54:27+5:302025-12-03T14:07:15+5:30
Trending Elaichi Paithani Saree : या पैठणीच्या पदरावर पारंपारीक पोपट, मोर, कमळाच्या आकाराची किंवा इतर फुलांच्या जरीची नक्षी असते.

इलायची पैठणी (Elaichi Paithani) साडी हा महाराष्ट्रातील पारंपारीक पैठणी साडीचाच एक प्रकार आहे. जी सध्या सोशल मीडिया आणि मार्केटमध्ये खूपच ट्रेडींग आहे.(Trending Elaichi Paithani Saree)
इलायची पैठणी नावातच या साडीचा रंग दर्शवलेला आहे. या साडीचा मुख्य रंग हा फिकट हिरवा किंवा वेलचीच्या साडीसारखा असतो आणि जो अतिशय आकर्षक दिसतो.
या पैठणीच्या पदरावर पारंपारीक पोपट, मोर, कमळाच्या आकाराची किंवा इतर फुलांच्या जरीची नक्षी असते.
काही इलायची पैठणी साड्यांमध्ये उभा आणि आडवा धागा वेगवेगळ्या रंगांचा वापरून धुपछावव प्रकारचा अनोखा रंगछटांचा परिणाम तयार केला जातो.
हा रंग सध्या अधुनिक आणि पारंपारीक दोन्ही समारंभासाठी पसंत केला जात आहे. वधूंसाठी तसंच कोणत्याही खास कार्यक्रमांसाटी इलायची पैठणी खूपच लोकप्रिय होत आहे.
इलायची पैठणीमध्ये तुम्हाला मुनिया, चंद्रकोर असे बरेच पर्याय मिळतील.
लग्नसमारंभात नेसण्याठी इलायची पैठणी उत्तम आहे. यातील जरी वर्कनुसार किंमत ठरते.