२०२६ चे ट्रेंडींग ब्लाऊज पॅटर्न; ८ युनिक डिझाइन्स-मागचा गळाही सुंदर-साडीवर दिसेल शोभून
Updated:March 12, 2026 18:11 IST2026-03-10T21:27:15+5:302026-03-12T18:11:16+5:30
Trending Blouse Designs of 2026 : अशा डिझाईन्ससाठी सिल्क कॉटन किंवा थोडं कडक कापड चांगले वाटते कारण त्यामुळे आकार स्पष्ट दिसतो.

हे सध्याचे ट्रेंडींग ब्लाऊज डिझाईन्स आहेत. या डिझाईन्सचे वैशिष्ट म्हणजे हे पारंपारीक साड्यांनाही अधुनिक लूक देतात. (10 Unique Blouse Designs Of Back Neck)
यामध्ये पाठीचा भाग पूर्णपणे बंद न ठेवता मध्यभागी विशिष्ट आकाराचे कापड काढले जाते. डायमंड, सर्कल आणि हॉर्ट शेपचे सुंदर कट-आऊट्समुळे ब्लाऊजला एक डिझाईनर टच मिळतो.
पाठीमागचा गळा बंद ठेवून तुम्ही त्यावर मिरर वर्कसुद्धा करून घेऊ शकता.
काही डिझाईन्स पाठीच्या मधोमध रांगेत बटन्स लावले आहेत. हे कापडाचेच बनवलेले पोटली बटन्स असून ते सध्या फॅशनमध्ये खूप लोकप्रिय आहेत. यामुळे ब्लाऊजला एक क्लासी लूक मिळतो.
ब्लाऊजचा मूळ रंग आणि गळ्याच्या बॉर्डरचा डिझाईन्सचा रंग वेगवेगळा ठेवल्यास लूक अधिकच उठून दिसतो.
या सर्व डिझाईन्समध्ये तुम्ही स्लिव्हजलेस पॅटर्न्स शिवून मागे असे कापडाचे बटन्स लावू शकता.
अशा डिझाईन्ससाठी सिल्क कॉटन किंवा थोडं कडक कापड चांगले वाटते कारण त्यामुळे आकार स्पष्ट दिसतो.
पाठीचा गळा मोठा किंवा डिझायनर असेल तर खांदे उतरू नयेत म्हणून डोरी लावणं फायदेशीर ठरते.