सणासुदीला नाकात हवाच मराठमोळ्या नथीचा ठसठशीत आकडा, पाहा नव्या डिझाइन्स- १०० रुपयांपासून पुढे
Updated:August 23, 2025 17:08 IST2025-08-23T15:08:26+5:302025-08-23T17:08:24+5:30

गणपती, महालक्ष्मी असे सण म्हटले की भरजरी साड्यांसह पारंपरिक दागिने आवर्जून घातले जातात. आता पारंपरिक दागिने घालायचे म्हटलं की सगळ्यात पहिले आठवते ती आपली ठसठशीत मराठी नथ.
सणासुदीच्या निमित्ताने तुम्हाला नथ घ्यायची असेल तर असे कित्येक प्रकारचे वेगवेगळे नथ डिझाईन्स बाजारात पाहायला मिळतात.
या नथ अगदी कमी किमतीत मिळतात पण तुमचं सौंदर्य मात्र लाखमोलाने खुलवून टाकतात.
अशी पारंपरिक धाटणीची नथ तर अनेकींची ऑल टाईम फेव्हरेट आहे. त्यामुळे हा नथीचा हा टिपिकल पॅटर्न नेहमीच ट्रेण्डिंग असतो.
पारंपरिक नथ डिझाईनमध्ये अशी सोनेरी मणी असणारीही नथ मिळते आणि ती चाफेकळी नाकात खूप खुलून दिसते.
हल्लीच्या नव्या पिढीच्या मुलींना अशी बानाई नथ विशेष आवडते.
थोडी नाजुक डिझाईनची पण नव्या पद्धतीची नथ आवडत असेल तर हे डिझाईन छान आहे.