समर स्पेशल खादी कॉटनच्या १० साड्या, उकाड्यातही नेसावीशी वाटेल अशी साडी-सुंदर आणि हलक
Updated:February 24, 2026 23:52 IST2026-02-24T12:51:09+5:302026-02-24T23:52:10+5:30
Summer Special Khadi Cotton Designs : खादीचा पोत आणि कॉलर ब्लाऊजची शिस्तबद्धता तुम्हाला एक वेगळीच ओळख मिळवून देतो.

उन्हाळ्याच्या दिवसांत आरामदायी आणि स्टायलिश दिसण्यासाठी खादी कॉटनच्या साड्या आणि रेडीमेड कॉलर ब्लाऊज हे उत्तम कॉम्बिनेशन आहे. (Summer Special Khadi Cotton Designs)
खादी कॉटनचे कापड नैसर्गिक आणि श्वास घेण्यायोग्य असल्यामुळे उष्ण हवामानात हे अतिशय सुखद वाटते. (Khadi Cotton Saree Designs)
उन्हाळ्यात फिकट रंग जसं की पांढरा, पेस्टल पिंक, स्काय ब्लू किंवा मिंट ग्रीन रंगांच्या खादीच्या साड्या अधिकच खुलून दिसतात.
रेडीमेड कॉलर असलेले ब्लाऊज साडीला एक अधुनिक आणि प्रोफेशनल लूक देतात. ज्यामुळे तुम्ही ऑफिस आणि मिटींगसाठी तयार राहू शकता.
तुम्ही चायनीज कॉलर, शर्ट कॉलर किंवा स्टँड कॉलर असे विविध पर्याय निवडू शकतात.
रेडीमेड कॉलर ब्लाऊजमध्ये बऱ्याचदा समोर किंवा पाठीमागे बटन्स किंवा झिप असते जी घालण्यास अतिशय सोपी असते.
कॉलर ब्लाऊजसोबत लांब बाह्या किंवा थ्री फोर्थ स्लिव्हज अतिशय शोभून दिसतात.
साडीसोबत ऑक्सिडाईज ज्वेलरी किंवा लांब कानातले घातल्यास तुमचा लूक परिपूर्ण होतो.
खादी कॉटन साड्यांना इस्त्री केल्यास त्या अधिक उठावदार आणि नीटनेटक्या दिसतात.
हा लूक तुम्ही ऑफिस, कॉलेज किंवा साध्या कौटुंबिक समारंभासाठी बिनधास्तपणे वापरू शकता.
खादीचा पोत आणि कॉलर ब्लाऊजची शिस्तबद्धता तुम्हाला एक वेगळीच ओळख मिळवून देतो.