उन्हाळ्यात डेली वेअरसाठी घ्या साऊथ कॉटन साड्या; १० सुंदर कॉम्बिनेशन्स-रेडीमेड ब्लाऊजही
Updated:March 17, 2026 15:09 IST2026-03-16T21:26:51+5:302026-03-17T15:09:23+5:30
Special South Cotton Saree : या ब्लाऊजमध्ये आतून जास्तीचे मार्जीन असते. ज्यामुळे फिटींग एडजस्ट करणं सोपं जातं.

उन्हाळ्याच्या दिवसांत जड साड्या नेसायला कोणालाही आवडत नाही. अशावेळी तुम्ही साऊथ कॉटनची साडी आणि रेडी टू वेअर ब्लाऊज हे कॉम्बिनेशन निवडू शकता. (Special South Cotton Saree With Ready To Wear Blouse)
साऊथ कॉटन साड्या प्रामुख्यानं त्यांच्या टिकाऊपणामुळे आणि मऊ पोतामुळे ओळखल्या जातात. (Special South Cotton Saree)
या साड्यांमध्ये वापरलं जाणारं सुती कापड उन्हाळ्यासाठी आणि रोजच्या वापरासाठी अतिशय सुखद असते.
यावर सहसा टेम्पल बॉर्डर आणि जरी वर्क असते जे साडीला सुंदर लूक देते. साऊथ कॉटनमध्ये मंगलगिरी, कोईम्बतूर किंववा सालेम कॉटन असे बरेच लोकप्रिय प्रकार आहेत.
रेडी टू वेअर ब्लाऊजमुळे टेलरकडे ब्लाऊज शिवण्यासाठी लागणारा वेळ आणि मेहनत वाचते.
हे ब्लाऊज विविध मापांमध्ये उपलब्ध असल्यानं त्वरीत खरेदीकरून वापरता येतात.
साऊथ कॉटन साडीवर कलमकारी किंवा इक्कत प्रिंटचे रेडीमेड ब्लाऊज अतिशय उठून दिसतात.
रेडीमेड ब्लाऊजमध्ये पॅडेड आणि नॉन पॅडेड असे दोन्ही पर्याय आवडीनुसार निवडता येतात.
या ब्लाऊजमध्ये आतून जास्तीचे मार्जीन असते. ज्यामुळे फिटींग एडजस्ट करणं सोपं जातं.
साडी साडीवर कॉन्ट्रास्ट रंगाचा डिझायनर रेडीमेड ब्लाऊज घातल्यास इंडो वेस्टर्न लूक मिळतो. हे कॉम्बिनेशन ऑफिस वेअर, सण-समारंभ किंवा साध्या कौटुंबिक कार्यकम्रांसाठी उत्तम आहे.