लग्नसराईसाठी स्पेशल कलांजली पैठणी; १० सुंदर, युनिक रंग, प्रिमियम आरी वर्क ब्लाऊजही मिळेल
Updated:January 5, 2026 16:42 IST2026-01-05T16:32:08+5:302026-01-05T16:42:35+5:30
New pattern of Kalanjali Paithani : पारंपारीक काठ पदर आणि मॉडर्न वर्क यामुळे तरूण मुलींपासून ते ज्येष्ठ महिलांपर्यंत सर्वांच्या पसंतीस उतरत आहे.

कलांजली पैठणी ही तिच्या मऊ सिल्क कापडामुळे नेसण्यासाठी अतिशय हलकी आणि आरामदायक ठरते. (New pattern of Kalanjali Paithani)
या साडीवर नाजूक जरकाम आणि आकर्षक मोर-पोपाटीची नक्षी असते ती महिलांना भूरळ घालते.
सध्याच्या फॅशननुसार या साडीचे रंग आणि पेस्टल शेड्स अतिशय वेगळे आणि उठून दिसणारे आहेत.
या साडीचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे यासोबत मिळणारे आरी वर्कचे ब्लाऊज.
ब्लाऊजवर हातानं केलेलं क्लिष्ट आणि भरभक्कम आरी वर्क साडीच्या सौंदर्यात अधिक भर घालते.
आरी वर्क केलेल्या ब्लाऊजमुळे साडीला एक विशेष राजेशाही आणि अधुनिक लूक येतो.
लग्नसमारंभांसाठी सण, उत्सव किंवा विशेष कार्यक्रमांसाठी ही साडी एक उत्तम पर्याय ठरत आहे.
पारंपारीक काठ पदर आणि मॉडर्न वर्क यामुळे तरूण मुलींपासून ते ज्येष्ठ महिलांपर्यंत सर्वांच्या पसंतीस उतरत आहे.
सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स आणि सेलिब्रिटींनी ही साडी प्रमोट केल्यामुळे लोकप्रियता अधिक वाढली आहे.
कमीत कमी किमतीत उत्तम दर्जा आणि रेडीमेड हेवी ब्लाऊज मिळत असल्यानं ही पैठणी सध्या ट्रेंडींग आहे.