गौरी गणपतीत घाला नवीन स्टाईलच्या सुंदर नथी; 7 युनिक डिजाईन्स, चेहऱ्याचं सौंदर्य वाढेल
Updated:August 18, 2025 09:45 IST2025-08-18T09:37:00+5:302025-08-18T09:45:01+5:30
Nath Designs New Nath Patterns : नथीमुळे चेहऱ्याचे आकर्षक वाढते आणि रुपही खुलून येते.

नथ हा भारतीय परंपरेतला एक महत्वाचा अलंकार आहे. घरगुती कार्यक्रम, लग्न समारंभ, सण-उत्सवांना नथ आवर्जून घातली जाते. नथीचे प्रकार परंपरा आणि प्रदेशांनुसार बदलत जातात. गौरी-गणपतीसाठी तुम्ही नववारी साडी नेसणार असाल त्यासाठी नवीन प्रकारच्या नथीच्या डिजाईन्स पाहूया. (Nath Designs New Nath Patterns)
पेशवाई नथ, बिंदळी नथ, बाजूबंध नथ, रिंगण नथ, चांदीची नथ, महाराष्ट्रीयन नथ, ब्राम्हणी नथ, हूप नथ असे नथीचे बरेच प्रकार आहेत.
नथीमुळे चेहऱ्याचे आकर्षक वाढते आणि रुपही खुलून येते. २०० रूपयांपासून ते ५०० रूपयांपर्यंत आकर्षक नथी तुम्हाला बाजारात उपलब्ध होतील.
नथ परीधान करण्याची प्रथा ही वैदीक काळापासून आहे. प्राचीन मान्यतांनुसार नथ घातल्यानं स्त्रीच्या शरीरात उर्जेचे संतुलन राखणं सोपं होतं.
आज नथ फक्त पारंपारीकदृष्ट्या महत्वाची नसून एक फॅशन स्टेटमेंट झाली आहे.
नऊवारी साडीवर किंवा काठपदराच्या साहावारी साडीवर नथ अगदी शोभून दिसते.
क्लिप ऑन नथ छेद न करता वापरली जाते. डायमंड नथ आधुनिक पोशाखांसोबत घालतात.