नव्या नवरीसाठी खास नऊवारी मुनिया पैठणीची नऊवारी; १० सुंदर रॉयल कॉम्बिनेशन्स
Updated:February 9, 2026 17:25 IST2026-02-06T19:04:00+5:302026-02-09T17:25:39+5:30
Muniya Paithani 10 Color Combinations : आजकाल ही साडी स्टिच स्वरुपातही मिळते. ज्यामुळे ती नेसणं खूपच सोपं होतं.

लग्नात नेसण्यासाठी मुनिया पैठणी हा उत्यंत रिच आणि उत्तम पर्याय आहे. मुनिया पैठणी ही महाराष्ट्राच्या वस्त्रपरंपरेतील एक अत्यंत शाही आणि लोकप्रिय साडी आहे.
या साडीच्या काठावर मुनिया म्हणजेच लहान पोपटांची आकर्षक नक्षी विणलेली असते. यामुळे कोणत्याही समारंभात तुम्ही उठून दिसता.
पोपटांचे हे डिझाईन्स रेशमी धाग्यांनी किंवा सोनेरी जरीनं तयार केले जाते. वेगवेगळ्या रंगात तुम्हाला ही नऊवारी साडी उपलब्ध होईल.
सिंगल मुनिया साडी सध्या लग्नसराईमध्ये बरीच उठून दिसते.
या साडीचा पदर अत्यंत भरगच्च असून त्यावर मोर आणि मोर आणि फुलांची कलात्मक नक्षी असते.
ही साडी नेसल्यावर स्त्रियांना एक राजेशाही आणि पारंपारीक मराठमोळा लूक मिळतो.
लग्नात नेसण्यासाठी किंवा मुंजेला नेसण्यासाठी ही साडी आजही पहिली पसंती ठरत आहे.
मोरपंखी, जांभळा, पोपटी आणि लाल अशा गडद रंगांमध्ये ही साडी अधिक खुलून दिसते.
ही साडी शुद्ध रेशीमपासून तायर केली जाते. ज्यामुळे तिला विशेष चमक असते.
आजकाल ही साडी स्टिच स्वरुपातही मिळते. ज्यामुळे ती नेसणं खूपच सोपं होतं. मुनिया पैठणी नऊवारी हे महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक वारश्याचे प्रतीक मानले जाते.