Makar Sankrati 2026 : मकर संक्रांतीसाठी घ्या काळी पैठणी; १० डिजाईन्स, काठ अन् पदराचे कलर सुंदर कॉम्बिनेशन्स
Updated:December 22, 2025 14:10 IST2025-12-22T13:55:07+5:302025-12-22T14:10:15+5:30
Makar Sankrati 2026 Black Saree For Makar Sankranti : काळ्या रंगाच्या पैठणीवर जेव्हा सोनेरी जर आणि नाजूक बुट्टी येते तेव्हा तिचे सौंदर्य अधिकच खुलून येते.

मकर संक्रांतीच्या (Makar Sankrati 2026) शुभ मुहूर्तावर काळी पैठणी (Black Saree) नेसणं हे केवळ परंपरेचे प्रतीक नसून ते एक फॅशन स्टेटमेंट देखील आहे. (Black Paithani for Makar Sankranti)
मकर संक्रांतीला थंडीचे दिवस असल्यामुळे काळा रंग उष्णता शोषून घेतो. म्हणून या दिवशी आवर्जून काळी साडी नेसण्याची जुनी परंपरा आहे. (Black Saree Designs)
काळ्या रंगाच्या पैठणीवर जेव्हा सोनेरी जर आणि नाजूक बुट्टी येते तेव्हा तिचे सौंदर्य अधिकच खुलून येते.
सध्या बाजाराता काठ-पदर पैठणी, सेमी पैठणी आणि येवला पैठणीमध्ये काळ्या रंगाचे अनेक सुंदर पर्याय उपलब्ध आहेत.
काळ्या पैठणीला गडद गुलाबी, पोपटी किंवा लाल रंगाचे काठ असतील तर ती अधिकच उठावदार दिसते.
पैठणीच्या पदरावरील मोर, पोपट आणि कमळाची नक्षी पारंपारीक लूक पूर्ण करते.
काळ्या पैठणीवर सोन्याचे दागिने किंवा ठुशी, कोल्हापुरी साज खूपच आकर्षक दिसतो.
संक्रांतीच्या दिवशी काळी पैठणी नेसून त्यावर पांढऱ्या हलव्याचे दागिने घातल्यास एक रॉयल लूक मिळतो.
ही साडी नवविवाहित स्त्रियांपासून ते ज्येष्ठ महिलांपर्यंत सर्वांवर अतिशय शोभून दिसते.
काळा रंग आणि सोनेरी जर यामुळे फोटोंमध्येही तुमचा लूक खूप छान आणि तेजस्वी दिसतो. पैठणी ही कधीही फॅशनच्या बाहेर जात नाही. ज्यामुळे संक्रांतीनिमित्त घेतलेली काळी पैठणी तुमच्या कपाटाची शोभा कायमच वाढवेल.