कमळाचे नाजूक नेकलेस डिझाईन्स; ७ पॅटर्न्स, साडी-कुर्ता कशावरही वापरा, गळ्यात उठून दिसेल
Updated:December 11, 2025 15:50 IST2025-12-11T15:27:21+5:302025-12-11T15:50:35+5:30
Lotus Necklace 8 Trending Designs :हे नेकलेस लहान साखळीवर असल्यानं ते इतर साध्या चेन्ससोबत लेअरींग करण्यासाठी उत्तम पर्याय आहेत.

कमळाच्या फुलांच्या डिझाईन्सचे नेकलेस सध्या खूपच फॅशनमध्ये लोकप्रिय झाले आहेत. जर तुमचा लोटस नेकलेस नाजूक असेल तर तो एका किंवा दोन साध्या साखळ्यांसोबत वेगवेगळ्या लांबीवर लेअर करा. (Lotus Necklace Patterns New Designs)
कमळ हे पावित्र्य, सौंदर्य आणि अध्यात्मिक शुद्धतेचे प्रतिक मानले जाते. ज्यामुळे या दागिन्यांना विशेष महत्व प्राप्त होते.
हे नेकलेस सोन्यामध्ये, चांदीमध्ये आणि विशेषत: गुलाब सोन्यामध्ये जास्त प्रमाणात उपलब्ध आहेत.
बहुतेक लोटस नेकलेस हे नाजूक आणि साधे स्वरूपाचे असतात. ज्यामुळे ते रोजच्या वापरासाठी योग्य ठरतात.
अनेक डिझाईन्समध्ये कमळाच्या पाकळ्यांना उठाव देण्यासाठी लहान झिरकॉन क्रिस्टल्स किंवा हिऱ्यांचा वापर केला जातो. हे नेकलेस लहान साखळीवर असल्यानं ते इतर साध्या चेन्ससोबत लेअरींग करण्यासाठी उत्तम पर्याय आहेत.
त्यांची लोकप्रियता वाढल्यामुळे ते केवळ मोठ्या ज्वेलरी शॉप्समध्येच नाही तर ऑनलाईन स्टोअर्समध्येही उपलब्ध आहेत. धार्मिक आणि सांस्कृतिक महत्व असल्यामुळे सण-समारंभाच्या काळात त्यांची मागणी विशेष वाढते.
त्यांची अधुनिक पण पारंपारीक डिझाईन युवा वर्गाला आणि फॅशन फॉलो करणाऱ्यांना खूप आकर्षीत करत आहे. स्वस्त दरात फॅशन ज्वेलरी म्हणून अनेक एक्सेसरी दुकानांमध्ये देखील याची खरेदी करू शकता. साध्या एकट्या लोटस पेंडंटची साखळी ऑफिस वेअर किंवा रोजच्या वेअरसाठी परफेक्ट असते.