मराठमोळ्या लोटस मंगळसूत्राचा खास ट्र्रेंड; १० सुंदर डिझाईन्स-साडीत युनिक, मॉडर्न लूक येईल
Updated:January 8, 2026 13:33 IST2026-01-08T13:09:00+5:302026-01-08T13:33:12+5:30
Lotus Mangalsutra Designs : हे डिझाइन्स वजनाने हलके आणि स्मार्ट असल्यामुळे दैनंदिन वापरासाठी किंवा ऑफिसला जाणाऱ्या महिलांसाठी उत्तम पर्याय आहे.

भारतीय संस्कृतीत कमळ (Lotus) हे देवी लक्ष्मीचे आसन मानले जाते. त्यामुळे कमळाचे डिझाईन्स असलेले मंगळसूत्र परिधान करणं हे सुख समृद्धी असल्याचं प्रतिक मानले जाते. (10 Designs Of Lotus Mangalsutra)
कमळाचा नैसर्गिक गुलाबी रंग दर्शवण्यासाठी अनेकदा यामध्ये पिंक सफायर किंवा रूबि यांसारख्या रत्नांचा वापर केला जातो.
लोटस मंगळसूत्र हे अधुनिक आणि पारंपारीक डिझाईन्सचा एक सुंदर संगम आहे. या मंगळसूत्रात मध्यभागी कमळाच्या फुलाच्या आकाराचे पेंडंट असते जे अत्यंत मोहक आणि सुबक दिसते.
कमळ हे पवित्रता, सौंदर्य आणि समृद्धीचे प्रतिक मानले जाते. त्यामुळे वैवाहिक जीवनात या गुणांचा समावेश व्हावा या उद्देशानं हे डिझाईन्स पसंत केले जातात.
कोणत्याही साध्या साडीवर तुम्ही हे मंगळसूत्र वापरू शकता. हे मंगळसूत्र पिवळ्या सोन्यात, रोज गोल्डमध्ये किंवा हिऱ्यांच्या सजावटीसह उपलब्ध असते.
कमळाच्या पाकळ्यांवर अतिशय बारीक नक्षीकाम केलेले असते त्यामुळे ते अधिक उठावदार दिसते.
पारंपारीक काळ्या मण्यांच्या सरीमध्ये हे कमळाचे पेंडंट गुंफलेले असते जे नकारात्मकतेपासून संरक्षण करते असे मानले जाते.
हे डिझाइन्स वजनाने हलके आणि स्मार्ट असल्यामुळे दैनंदिन वापरासाठी किंवा ऑफिसला जाणाऱ्या महिलांसाठी उत्तम पर्याय आहे.
पांरपारीक जड मंगळसूत्रांपेक्षा लोटस मंगळसूत्र दिसायला अधक ट्रेंडी वाटतं जे कोणत्याही साडीवर किंवा भारतीय ड्रेसवर शोभून दिसते.
सध्या तरूण वधू आणि महिलांमध्ये या फ्लोरल डिझाइन्सची मोठी क्रेझ पाहायला मिळत आहे.